मुंबई : सोनी टीव्हीच्या ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोमध्ये सामान्य लोकांना खेळण्याची संधी मिळते, तसेच अनेक सेलिब्रिटी देखील येथे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत हा बुद्धीचा खेळताना दिसतात. पण, या शुक्रवारचा म्हणजेच 3 डिसेंबरचा एपिसोड सर्वांसाठीच खूप खास ठरला आहे. या शुक्रवारी केबीसीने एक मोठे यश संपादन केले आहे. या लोकप्रिय शोने 1000 एपिसोडचा टप्पा पूर्ण केला आहे. हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी आणि खेळ खेळण्यासाठी अमिताभ बच्चन यांचे कुटुंबीय शोमध्ये पोहोचले होते.
केबीसीच्या या स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता आणि नात नव्या नवेली सहभागी झाल्या होत्या. याशिवाय जया बच्चनही या शोमध्ये ऑनलाईन सहभागी झाल्या होत्या.
सोनी टीव्हीच्या सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘केबीसी’ने एक हजार भाग पूर्ण केल्याच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांचे कुटुंब या गेममध्ये सामील झाले होते. या एपिसोडदरम्यान जया बच्चन यांनी अनेकवेळा बिग बींची बोलतीच बंद केली आणि अनेक वेळा त्यांना घरी केलेल्या निष्काळजीपणाची आठवणही करून दिली. शोमध्ये उपस्थित नव्या आणि श्वेता देखील जया बच्चन यांना पूर्ण पाठिंबा देत होत्या. या शोच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले जेव्हा अमिताभ स्वतःच्या शोमध्ये कमी बोलताना आणि जास्त ऐकताना दिसले.
Chehre ki muskaan, dheer saare gyaan aur aap sabhi ke pyaar ke saath #KBC poore kar raha hai apne 1000 episodes, iss haseen pal mein bhavuk hue AB sir!
Dekhiye iss poori journey ki ek jhalak #ShaandaarShukravaar episode mein, iss Friday raat 9 baje, sirf Sony par. @SrBachchan pic.twitter.com/Ab31UkIMOy
— sonytv (@SonyTV) November 29, 2021
अमिताभ बच्चन यांची नात नव्याने त्यांच्या या 21वर्षांच्या प्रवासाचा व्हिडीओ दाखवला. त्या व्हिडीओमध्ये अमिताभ यांचा केबीसीसोबतचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला होता. जवळपास दोन दशकांपासून सुरू असलेल्या या शोने यशाचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. हा व्हिडीओ संपल्यानंतर अमिताभ बच्चन भावूक झालेले दिसले.
अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडीओ सुरु असताना जया बच्चन म्हणाल्या की, तुम्ही लोक हा शो कधीच थांबवू नका. भले कमीप्रमाणात करा पण सतत करा. हा शो बंद करण्याचा निर्णय झाल्यावर कितीतरी लोकांची निराशा झाली होती. यातून कितीतरी लोकांना खूप महत्त्वाची माहिती मिळते..’ यानंतर बिग बींच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते स्वतःला रडण्यापासून रोखू शकले नाहीत.
यावेळी अमिताभ यांनी या शोमध्ये सहभागी होण्याचा अनुभव शेअर केला. त्यांनी सांगितले की, जेव्हा ते चित्रपटांमधून टीव्हीकडे वळत होते, तेव्हा लोकांनी त्यांना सांगितले की त्यांची प्रतिमा खराब होईल. ते म्हणाले, ‘परंतु, माझी मजबुरी होती, कारण मला त्यावेळी चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हते. म्हणूनच, मला टीव्हीकडे वळावे लागले. मी लंडनला गेलो आणि तिथे असा एक शो पाहिला. चॅनलचे लोक म्हणाले की, जर तुम्ही असे वातावरण तयार करू शकत असाल, तर आम्ही देखील असा शो सुरू करू. याच्या एका एपिसोडनंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आमचं जगच बदलून गेलं. शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाकडून काही ना काही शिकायला मिळाले’, असे अमिताभ यांनी सांगितले.
या एपिसोडमध्ये सहभागी झालेली अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली हिने सांगितले की, ती आरती नायकसाठी हा गेम खेळणार आहे आणि या शोमधून जिंकलेली रक्कम ती तिच्या एनजीओला सखी फाउंडेशनला देईल. यावेळी तिने सांगितले की, सोनाली नायक या गरीब मुलींना मोफत शिक्षण देतात. एक हजाराहून अधिक मुलींना त्या मोफत शिकवत आहेत.
यावर अमिताभ यांनी सांगितले की, नव्या महिला सशक्तीकरणासाठी खूप काम करत आहे. यावर नव्याने सांगितले की, तिच्या एनजीओने गडचिरोली, महाराष्ट्रातील महिलांसाठी पीरियड पॉझिटिव्ह रूम बनवली आहे. कारण, त्या गावातील महिलांना मासिक पाळीदरम्यान गावाबाहेर ठेवले जाते. त्यामुळे त्या महिलांना कोणतीही अडचण येऊ नये, आराम मिळावा म्हणून या खोल्या तयार करण्यात आल्या आहेत.
Ankita Lokhande-Vicky Jain Wedding | लगीन घटीका समीप आली! अंकिता-विकीच्या लग्न सोहळ्याला सुरुवात!