MC Stan | एमसी स्टॅन याच्यावर भडकली अर्चना गौतम, थेट केला हा मोठा आरोप

| Updated on: Apr 10, 2023 | 5:49 PM

अब्दू रोजिक याने काही दिवसांपूर्वी एमसी स्टॅन याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. अब्दू रोजिक याचे आरोप ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला. काही दिवसांपूर्वी शिव ठाकरे याने या वादावर मोठे भाष्यही केले. आता एमसी स्टॅन याच्यावर अर्चना हिने गंभीर आरोप केलाय.

MC Stan | एमसी स्टॅन याच्यावर भडकली अर्चना गौतम, थेट केला हा मोठा आरोप
Follow us on

मुंबई : बिग बाॅस 16 चा फिनाले होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, असे असताना देखील बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) मधील सदस्य कायम चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅस 16 मधील सदस्य पार्टी करून धमाल करताना दिसत आहेत. सलमान खान याने बिग बाॅस 16 च्या सदस्यांसाठी खास पार्टीचे आयोजन केले होते. सलमान खान (Salman Khan) याच्यानंतर फराह खान हिने देखील बिग बाॅस 16 च्या सदस्यांसाठी पार्टी ठेवली. काही दिवसांपूर्वीच शिव ठाकरे याने देखील बिग बाॅस 16 च्या सदस्यांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीतील अनेक व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले.

गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅस 16 मधील अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये जोरदार वाद बघायला मिळतोय. काही दिवसांपूर्वीच अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर काही गंभीर आरोप केले. अब्दू रोजिक याचे आरोप ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. यावर काही दिवसांपूर्वी शिव ठाकरे यानेही भाष्य केले.

बिग बाॅस 16 मध्ये असताना अब्दू रोजिक, एमसी स्टॅन, साजिद खान, सुंबुल ताैकीर, शिव ठाकरे आणि निम्रत काैर यांच्यामध्ये खास मैत्री बघायला मिळाली. विशेष म्हणजे यांची मैत्री ही शेवटच्या दिवसांपर्यंत टिकून होती हे विशेष. मात्र, काही दिवसांपासून सतत अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्यामध्ये वाद सुरू आहेत.

नुकताच अर्चना गौतम हिने एमसी स्टॅन याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. मुळात म्हणजे बिग बाॅस 16 मध्ये असतानाही कधीच अर्चना गौतम आणि एमसी स्टॅन यांचे जमले नाही. दोघेही बिग बाॅसच्या घरात सतत भांडताना दिसले. आता तर अर्चना गौतम हिने एमसी स्टॅन याच्याबद्दल मोठे विधान केले आहे.

अर्चना गौतम म्हणाली की, मी एक राजकारणी आहे, मला मी कशी दिसत आहे याचा काहीच फरक पडत नाही. मी शोमध्ये रिअल होते आणि मी शोमध्ये प्रामाणिक राहिले. यामुळेच माझ्या चाहत्यांनी मला सपोर्ट केला. मी मंडलीसारखी प्लॅनिंग केली नाही. यांची मैत्री फेक होती. आता शो संपल्यावर एमसी स्टॅन हा अब्दू रोजिक याच्यासोबत भांडण करत आहे. तसेच एमसी स्टॅन हा डबल स्टँडर्ड असल्याचे देखील अर्चना हिने म्हटले.

बिग बाॅस 16 मध्ये असताना एका भांडणामध्ये अर्चना गौतम हिने थेट शिव ठाकरे याचा गळा पकडला होता. यानंतर शिव ठाकरे याच्या गळ्याला दुखापत देखील झाली होती. त्यानंतर अर्चना गौतम हिला घराबाहेरही काढण्यात आले. मात्र, त्यानंतर सलमान खान याने अर्चना गौतम हिला परत बिग बाॅसच्या घरात घेतले होते.