मुंबई : बिग बाॅस १६ चे यंदाचे सीजन मोठा हंगामा करताना दिसत आहे. बिग बाॅसच्या (Bigg Boss 16) घरातील स्पर्धेक हे प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन (Entertainment) करत आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी घरामध्ये सदस्य भांडणे करताना दिसत आहेत. कालच्या एपिसोडमध्ये बेडरूमवरून मोठा हंगामा झाला होता. सध्या निम्रत काैर ही बिग बाॅसच्या घराची कॅप्टन आहे. फिनालेसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना घरामध्ये मोठे घमासान होताना दिसत आहे. अर्चना गाैतम (Archana Gaitam) नेहमीप्रमाणेच कारण नसताना घरातील सदस्यांसोबत पंगे घेताना दिसतंय. प्रियंका चाैधरी आणि टीना दत्ता यांच्या निशाण्यावर नेहमीप्रमाणेच शालिन भनोट हा आहे. या आठवड्यामध्ये शालिन भनोट, प्रियंका चाैधरी, शिव ठाकरे आणि टीना दत्ता हे नाॅमिनेशनमध्ये आहेत.
प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम या कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी कधी काय करतील याचा अजिबातच नेम नाहीये. सध्या सोशल मीडियावर प्रियंका आणि अर्चना यांचे काही व्हिडीओ आणि फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम या सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहेत. अनेकांनी प्रियंका आणि अर्चना यांच्यावर टीका केलीये. इतकेच नाहीतर थेट यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही करण्यात आलाय.
These women did something atrocious in last night’s episode of #BiggBoss16. A drinking glass of water, them without being freshen up, and enjoying a cup of coffee, they performed the auspicious Surya Arghya. This is ridiculous mockery of our beliefs. @ColorsTV pic.twitter.com/8LfIpAxpjr
— Apratim. (@subtlysomebody) January 26, 2023
प्रियंका आणि अर्चना बिग बाॅसच्या घरात अंघोळ न करता सूर्याला अर्घ देताना दिसल्या होत्या. मुळात म्हणजे अर्चना आणि प्रियंका हा कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी काहीही करू शकतात.
अंघोळ न करता सूर्याला अर्घ दिल्यामुळेच प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम यांना ट्रोल केले जात आहे. अनेकांनी यांच्या विरोधात रोष व्यक्त केलाय. काही प्रेक्षकांनी यांच्यावर दिखावा करत असल्याचा आरोप केला आहे.
अंघोळ करूनही प्रियंका चाैधरी आणि अर्चना गाैतम या सूर्याला अर्घ देऊ शकल्या असत्या असे अनेकांनी म्हटले आहे. रिपोर्टनुसार टीना दत्ता ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये बिग बाॅसच्या घराबाहेर साैंदर्या शर्मा ही पडली असून बिग बाॅसने घरातील सदस्यांना मोठा अधिकार देत या आठवड्यामध्ये घराच्याबाहेर कोणाला काढायचे याचा अधिकार थेट देऊन टाकला होता. यानंतर घरातील सदस्यांनी मोठा निर्णय घेत साैंदर्या शर्मा हिला बेघर केले.