Anupamaa | अनुपमा सीरियलमध्ये ट्विस्ट, पाखीने उचलले मोठे पाऊल…

| Updated on: Oct 30, 2022 | 2:39 PM

या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करून अनुपमा मालिकेच्या निर्मात्यांचा समाचार घेत आहेत. पाखीचा निर्णय प्रेक्षकांना देखील आवडला नाहीये.

Anupamaa | अनुपमा सीरियलमध्ये ट्विस्ट, पाखीने उचलले मोठे पाऊल...
Follow us on

मुंबई : टीव्ही सीरियल ‘अनुपमा’मध्ये मोठे ट्विस्ट आले आहे. पाखीने घरच्यांच्या परवानगीशिवाय पळून जाऊन लग्न केले, असे अनुपमामध्ये दाखवले जातंय. मात्र, हे प्रेक्षकांच्या अजिबात पचनी पडले नसल्याचे दिसत आहे. पाखी लग्न करून घरी येते, याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करून अनुपमा मालिकेच्या निर्मात्यांचा समाचार घेत आहेत. मालिकेमधील हा ट्विस्ट प्रेक्षकांना अजिबातच आवडलेला नाहीये.

अनुपमा सीरियलमध्ये पाखीने अधिकसोबत लग्न केले. काही दिवसांपूर्वी पाखी आणि अधिकच्या प्रेम प्रकरणाबद्दल घरातील सर्व सदस्यांना कळाले होते. यादरम्यान शाह कुटुंबियांनी अधिक आणि पाखीच्या प्रेमाला विरोध केला होता. इतकेच नाही तर वनराज शाहने तर पाखीला इतर शहरामध्ये पाठवण्याचे देखील ठरवले होते. हे सर्व घडण्याच्या अगोदरच आता पाखी आणि अधिकने लग्न केले.

अधिकची बहीण अर्थात बरखा हिला देखील अधिक आणि पाखीचा निर्णय आवडला नाहीये. अधिकला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करणारी बरखा देखील या लग्नाला विरोधात करताना दिसत आहे. अनुपमामध्ये जरी मोठा ट्विस्ट आलाय, परंतू पाखीचे लग्न दाखवल्याने प्रेक्षक नाराज झाले असून यामुळे चुकीचा संदेश समाजामध्ये जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पाखीचे लग्न अनुपमामध्ये दाखवण्यात आल्याने शोच्या टीआरपीवर याचा काय परिणाम होतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.