Bigg Biss 16 | ‘त्या’ व्हिडीओनंतर सौंदर्या आणि गौतमच्या नात्यात पडणार फूट?

| Updated on: Nov 06, 2022 | 11:34 AM

बिग बाॅसच्या घरात मैत्री आणि प्रेम देखील जोरदार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात गाैतम आणि साैंदर्या यांचा लव्ह अॅंगल पुढे येतोय.

Bigg Biss 16 |  त्या व्हिडीओनंतर सौंदर्या आणि गौतमच्या नात्यात पडणार फूट?
Follow us on

मुंबई : कलर्स टीव्हीचा बहुचर्चित आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ असलेला शो म्हणजे बिग बाॅस आहे. बिग बाॅस टीआरपीमध्येही टाॅपला आहे. बिग बाॅसचे हे 16 वे सीजन धमाकेदार होत आहे. बिग बाॅसच्या निर्मात्यांनी शोला टाॅपमध्ये नेण्यासाठी अगोदरपासूनच कंबर कसली होती. इतकेच नाही तर बिग बाॅस 15 ला ज्या चुका झाल्या, त्या देखील यंदाच्या सीजनला सुधारण्यात आल्यात. बिग बाॅस 16 ला प्रेक्षकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय.

बिग बाॅसच्या घरात मैत्री आणि प्रेम देखील जोरदार सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात गाैतम आणि साैंदर्या यांचा लव्ह अॅंगल पुढे येतोय. मात्र, गाैतम साैंदर्यावर प्रेम फक्त शोसाठी करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सलमान खान साैंदर्याला असा काही व्हिडीओ दाखवतो की, तो पाहून बिग बाॅसच्या घरात साैंदर्या फुल ड्रामा करताना दिसते.

बिग बॉस 16 च्या प्रत्येक नवीन एपिसोडमध्ये घरामध्ये खूप ड्रामा पाहायला मिळत आहे. प्रत्येक शुक्रवार आणि शनिवारी विकेंडचा वार होतो. यादरम्यान सलमान खान अनेक स्पर्धकांचा क्लास देखील लावतो. यावेळी सलमान खान अर्चना, प्रियंका आणि साजिद खानचा क्लास घेताना दिसला होता.

या विकेंडला सौंदर्या शर्माला गौतम विगचे सत्य सलमान खानने दाखवले. गाैतमसमोर शालिन आणि निम्रत साैंदर्याचा मजाक उडवतात. मात्र, हे सर्व ऐकूनही गाैतम काहीच बोलत नाही. हा व्हिडीओ सलमान खान सौंदर्याला दाखवतो, त्यानंतर सौंदर्या घरात खूप गोंधळ घालते आणि रडते.