मुंबई : प्रेक्षकांची ‘बिग बॉस 15’ ची (Bigg Boss 15) प्रतीक्षा आज संपणार आहे. आज (2 ऑक्टोबर) संध्याकाळपासून प्रेक्षकांना दररोज मनोरंजनाचा पूर्ण डोस मिळणार आहे. सलमान खान (Salman Khan) 15 स्पर्धकांसह त्याच्या शोची सुरुवात करणार आहे. ग्रँड प्रीमियर नाईट दरम्यान भरपूर मनोरंजन होणार आहे. चाहते मजा, विनोद आणि मारामारी, भांडणे सर्व एकत्र पाहण्यासाठी आता खूप उत्सुक आहेत. जर, तुम्ही देखील शोबद्दल उत्साहित असाल, तर या बातमीमध्ये, शोबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेता येईल…
‘बिग बॉस 15’ च्या भव्य प्रीमियर रात्री पार पडणार आहे. दरवेळी प्रमाणे हा शो बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान होस्ट करताना दिसणार आहे. आज (2 ऑक्टोबर) रात्री, हा शो कलर्स वाहिनीवर रात्री 9:30 वाजता प्रसारित केला जाईल.
कलर्स चॅनेलवर ‘बिग बॉस 15’ आजपासून दररोज पाहता येईल. सोमवार ते शुक्रवार हा शो रात्री 10.30 वाजता प्रक्षेपित होईल. त्याचबरोबर हा कार्यक्रम दर शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता प्रसारित केला जाईल. यासह, आपण दर वेळी प्रमाणे हा शो वूट अॅपवर देखील पाहू शकता.
या वेळी घराचे डिझाईन फिल्ममेकर ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता ओमुंग कुमार यांनी जंगल या थीमवर केले आहे. त्यामुळे स्पर्धकाला जंगलात राहावे लागेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. वास्तविक, प्रत्येक वेळी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांना लक्झरी लाईफ जगण्याची संधी मिळते, परंतु यावेळी निर्मात्यांनी ते बदलून नवीन तडका लावला आहे, जो लोकांना आवडेल.
बिग बॉस ओटीटीच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी हे उघड झाले की, प्रतीक सहजपाल ‘बिग बॉस 15’मध्ये जाणार आहे. प्रतीक सहजपालसह 14 जणांची नावे जाहीर झाली आहेत. यातील पुष्टी झालेल्या स्पर्धकांच्या नावांमध्ये शमिता शेट्टी, निशांत भट्ट, जय भानुशाली, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, अक्सा सिंग, डोनल बिष्ट, उमर रियाज, सिम्बा नागपाल, साहिल श्रॉफ आणि पंजाबी गायिका अफसाना खान यांचा समावेश आहे.
या शोचे अनेक प्रोमो आतापर्यंत सोशल मीडियावर समोर आले आहेत, जे हेडलाईन्स बनत आहेत. ही स्पर्धा यावेळी आणखी तगडी असणार आहे. स्पर्धकांना या घरात टिकून राहण्यासाठी अधिक मेहनत करावी लागणार आहे.
श्वेता तिवारीला मिळाली मुलगा रेयांशची कस्टडी, अभिनेत्रीने पती अभिनव कोहलीला फटकारले!