मुंबई : बिग बाॅसच्या घरात नुकताच नाॅमिनेशन टास्क पार पडलाय. अंकित गुप्ता हा घराचा नवा राजा आहे. अंकितने मोठा गेम खेळत आपल्या ग्रुपमधील सर्वच सदस्यांना नाॅमिनेशनमधून वाचवले आहे. बिग बाॅसच्या घरात सध्या दोन ग्रुप आहेत. अंकित हा साैंदर्या, प्रियंका, अर्चना, टीना यांच्या ग्रुपमधील सदस्य आहे. यामुळे यांच्या ग्रुपची ताकद वाढलीये. अर्चना देखील यावेळी नाॅमिनेशनमधून सुरक्षित आहे. बिग बाॅसने दिलेल्या शिक्षेमुळे एमजी अगोदरच नाॅमिनेशनमध्ये आहे. यावेळी अंकितच्या ग्रुपने निम्रतला देखील नाॅमिनेट केले आहे.
या आठवड्यामध्ये नाॅमिनेट झाल्याने निम्रतला खूप जास्त वाईट वाटले असून निम्रत थेट रडायला लागलीये. मात्र, आतापर्यंत निम्रत फक्त दोनदा नाॅमिनेट झाल्याने यावेळी प्रियंकाने तिला मुद्दाम नाॅमिनेट केल्याचे सांगितले आहे.
यासर्व नाॅमिनेशन प्रक्रियेनंतर घरातमध्ये मोठा किस्सा घडला आहे. साैंदर्या शर्मा ही अंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली असता अचानक त्याच बाथरूममध्ये शालिन भनोट देखील जातो.
थोडासा दरवाजा उघडल्यानंतर साैंदर्या शर्मा जोरात ओरडते. शालिन म्हणतो की, साॅरी साॅरी मला खरच माहिती नव्हते की, साैंदर्या अंघोळीला गेलीये. साैंदर्या म्हणते की, मी दरवाजा लाॅक केला होता.
बहुतेक दरवाजा व्यवस्थित लाॅक झाला नसावा. यानंतर शालिनला शिव ठाकरे चिडवताना दिसतोय. परंतू साैंदर्या अंघोळ करून बाहेर आल्यावर शालिन सांगतो की, मी हे मुद्दाम अजिबात केले नाहीये.
साैंदर्या शर्मा याकडे दुर्लक्ष करून याचा मोठा विषय बनवत नाही. बिग बाॅस आता घरातील सदस्यांना नवीन टास्क देणार असून यामुळे घरात मोठा हंगामा होणार असल्याचे दिसत आहे.