साजिद खान प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने या मोठ्या अभिनेत्यावर केले गंभीर आरोप

| Updated on: Oct 30, 2022 | 1:40 PM

4 आठवड्यापासून साजिद बिग बाॅसच्या घरात असून एकदम चांगला गेम खेळत आहे.

साजिद खान प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा हिने या मोठ्या अभिनेत्यावर केले गंभीर आरोप
Follow us on

मुंबई : बिग बॉस 16 चांगलेच रंगात आले असून शोचा टीआरपीही चांगला आहे. गाैतमच्या एका निर्णयामुळे सध्या घरात जोरदार हंगामा बघायला मिळतोय. मात्र, बिग बाॅसच्या घराबाहेरही एक वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. साजिद खान याला बिग बाॅसच्या घरात पाहून अनेकांनी जाहिरपणे नाराजी व्यक्त केली. 4 आठवड्यापासून साजिद बिग बाॅसच्या घरात असून एकदम चांगला गेम खेळत आहे. मात्र, साजिद खानच्या विरोधात बाहेर एक मोहिम राबवली जातंय. विशेष म्हणजे आता या वादात थेट सलमान खानला ओढण्यात आले.

साजिद खानवर गेल्या काही वर्षांपासून सतत ‘मी टू’चे आरोप केले जात आहेत. हे सर्व सुरू असतानाच साजिद खान बिग बाॅसमध्ये गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर हे सर्व प्रकरण थेट पोलिसांमध्ये देखील गेले. मात्र, यावर बिग बाॅस शोचा होस्ट सलमान खानने अजून काहीच भाष्य न केल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

शर्लिन चोप्राने साजिद खानच्या वादात सलमान खानला ओढले आहे. शर्लिनने म्हटले की, सलमान खानच्या मदतीनेच साजिद खान बिग बाॅसमध्ये सहभागी झालाय. नुकताच शर्लिन चोप्रा जुहू पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली होती. मात्र, पोलिसांनी तिची काहीच मदत केली नसल्याचा आरोप शर्लिनने केला आहे. यावेळी ती निराश देखील दिसत होती.

शर्लिन चोप्रा म्हणाली की, साजिद खानच्या डोक्यावर दुसऱ्या कोणाचाही हात नसून सलमान खानचा हात आहे. त्यामुळे साजिद खानचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही. मी सहायक पोलिस आयुक्तांना फोन केला होता. मी त्यांना सांगितले की, जुहू पोलीस माझी काहीच मदत करत नाहीत. माझ्यासारख्या अभिनेत्रीची पोलीस मदत करत नाहीत तर एखाद्या सामान्य महिलेचा काय विषय असणार?