मुंबई : सलमान खान याच्यामुळे या आठवड्याचा विकेंडचा वार जबरदस्त ठरलाय. सलमान खान याने अगोदर शालिन भनोट आणि एमसी स्टॅनचा क्लास घेतला. यावेळी एमसी आणि शलिन दोघेही माफी मागतात. परंतू यादरम्यान सलमान खान याने शालिन भनोट याचा धमाकेदार अभिनय करून दाखवला. हे पाहून प्रेक्षक पोट धरून हसायला लागले. यानंतर चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रितेश देखमुख आणि जेनेलिया देखमुख आले होते, यांच्यासोबत सलमान खान याने डान्स करत धमाल केली.
बिग बाॅस 16 मध्ये सलमान खान एकदम भारी मूडमध्ये दिसत असल्याने चाहत्यांचा उत्साह अधिक वाढल्याचे दिसत आहे. विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा घरातील सदस्यांचा फक्त क्लास घेत नसून त्यांच्यासोबत मस्ती करताना देखील दिसतोय. बिग बाॅस सीजन 16 हीट ठरत आहे.
धमाल, मस्ती केल्यानंतर सलमान खान हा प्रियंका चाैधरी हिच्याकडे येतो. कारण नुकताच प्रियंका हिने अंकित गुप्ताला घराच्याबाहेर पडण्यापासून वाचण्यासाठी 25 लाख विजेत्याचे सोडले आहेत. परंतू मी जे केले ते बरोबर आहे. परंतू साजिद खान याने सुंबुलला वाचून चुक केल्याचे प्रियंकाने म्हटले आहे.
Priyanka is shivering ???
Stay Strong Priyanka We all #PriyAnkit Fans are supporting you and want to make you Win #BB16pic.twitter.com/yjE7C8i1NK— PriyAnkit Love Birds (@Priyankit_Union) December 23, 2022
प्रियंकाच्या म्हणण्यानुसार तिने घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे. परंतू साजिद खानचा निर्णय चुकीचा आहे. यावरून प्रियंका भांडताना दिसली. आता सलमान खान याने प्रियंका हिचा चांगलाच क्लास घेतला आहे. घरामध्ये पहिल्यांदाच देवी आल्याचे सलमान खान याने म्हटले.
नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल झालाय. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अंकित गुप्ता हा घराच्याबाहेर पडला आहे. सर्वांना वाटते की, या आठवड्यामध्ये नाॅमिनेशन होणार नाहीये. परंतू शेवटी बिग बाॅस घरातील सदस्यांना मोठा झटका देत अंकितला घराच्या बाहेर काढतात.