मुंबई : बिग बाॅस १६ च्या घरात फिनाले विकला सुरूवात झाल्यापासून मोठा हंगामा बघायला मिळतोय. गेल्या दोन आठवड्यांपासून सलमान खान हा विकेंडचा वार होस्ट करताना दिसत नाहीये. अगोदर फराह खान आणि नंतर करण जोहर (Karan Johar) यांनी विकेंडचा वार होस्ट केला. करण जोहर याने देखील विकेंडच्या वारमध्ये घरातील सदस्यांचा चांगला क्लास लावला. बिग बाॅस १६ मधील कायमच चर्चेत राहणारे नाव म्हणजे अर्चना गाैतम आहे. अर्चना गाैतम काहीही कारण नसताना घरातील सदस्यांसोबत भांडणे करताना दिसते. कधी कधी दुधावरून तर कधी पराठ्यांवरून हे भांडणे सुरू असतात. गेल्या काही दिवसांपासून एमसी स्टॅन हा अर्चना गाैतम हिच्या निशाण्यावर आहे. कारण काहीही कारण काढून अर्चना गाैतम ही एमसी स्टॅनला भांडताना दिसते. या आठवड्यामध्ये सुंबुल ताैकीर ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडलीये. आता बिग बाॅसच्या घरात फक्त सहा स्पर्धेक राहिले आहेत.
सुंबुल ताैकीर हिने बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर अनेक मोठे खुलासे केले आहेत. सुंबुल हिने थेट मंडळीपैकीच बिग बाॅस विजेता व्हावा असे म्हटले आहे. सुंबुल ताैकीर ही अगोदर शालिन भनोट आणि टीना दत्ता यांच्यासोबत राहत होती. परंतू त्यानंतर ती मंडळीमध्ये सहभागी झाली.
नुकताच बिग बाॅसचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये घरातील सदस्यांना बिग बाॅसने राशनसाठी एक टास्क दिल्याचे दिसत असून यामध्ये घरातील प्रत्येक सदस्यांला रँकप्रमाणे राशन दिले जाणार आहे.
अर्चना गाैतम ही निमृतला ६ वी रँक देते. त्यावर शालिन भनोट देखील म्हणतो की, निम्रतचे योगदान खरोखरच खूप जास्त कमी आहे, त्यामुळे ती ६ व्या रँकवरच ठीक आहे. निम्रत शालिन भनोट याला म्हणते की, तुझ्यासारखे मला कोणी फेक तरी म्हटले नाहीये ना…
निम्रत काैर आणि शालिन भनोट यांच्यामध्ये यावरून जोरदार वाद झाला. घरातील सदस्य योगदानाप्रमाणे अर्चना गाैतम हिला रँक देत चार नंबरवर थांबण्यास सांगतात. मात्र, माझे योगदान सर्वात जास्त असल्याचे सांगत पहिल्या रँकवर मीच थांबणार म्हणत अर्चना भांडणे करताना दिसते.
यावेळी निम्रत काैर आणि घरातील सर्वच सदस्य अर्चनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतू अर्चना म्हणते की, राशन नाही मिळाले तरीही चालते पण मी स्वत: ला खालच्या रँकवर अजिबात घेणार नाही. यामुळे आता घरामध्ये मोठा हंगामा होताना दिसणार आहे.