मुंबई : बिग बाॅसच्या घरात मोठा हंगामा होताना दिसत आहे. साैंदर्या शर्मा ही बेघर झालीये. बिग बाॅसने (Bigg boss 16) घरातील सदस्यांना एक मोठा निर्णय घेण्याचा अधिकार देत म्हटले की, टीना दत्ता, शालिन भनोट, सुंबुल ताैकीर आणि साैंदर्या शर्मा या नाॅमिनेट सदस्यांपैकी एकाला बेघर करण्याचा निर्णय घरातील सदस्यांनी मिळून घ्यायचा आहे. यावेळी घरातील जवळपास सर्वच सदस्य साैंदर्या शर्मा हिला बेघर करण्याचा निर्णय घेतात. आता साैंदर्या शर्मा ही बेघर झालीये. आता बिग बाॅसच्या घरात आठ सदस्य उरले असून फिनालेसाठी फक्त वीस दिवस बाकी आहेत. घरात टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्यामध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. दोघेही जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
साैंदर्या शर्मा बेघर झाल्यामुळे अर्चना गाैतम दु:खी असल्याचे दिसत आहे. आता प्रियंकाच्या ग्रुपसोबत राहण्याचा प्रयत्न अर्चना करताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घरातील वादग्रस्त स्पर्धेक म्हणून अर्चना गाैतमची ओळख आहे.
नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल झालाय. या प्रोमोमध्ये अर्चना गाैतम किचनमध्ये काम करताना दिसत आहे. मात्र, किचनमध्ये काम करत असताना अचानकच अर्चना ओरडत किचनमधून पळताना दिसत आहे.
अर्चना जोर जोरात ओरडत आहे आणि घरामध्ये पळत आहे. अर्चनाचा ओरडतानाचा आवाज ऐकून टीना दत्ता आणि प्रियंका चाैधरी घरामध्ये येतात. यावेळी प्रियंका अर्चनाला काय झाले असे विचारत आहे.
अर्चना कोणाच्याच प्रश्नांचे उत्तरे देत नसून फक्त ओरडत आहे. आता हाच प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत.
एकाने लिहिले की, ही अर्चना फक्त कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी हे सर्व नाटक करत आहे. दुसऱ्याने लिहिले की, बहुतेक हिला मोर दिसला वाटतं. तिसऱ्याने लिहिले की, दरवेळीच सीजन संपण्याच्या काही दिवस अगोदर घरातील काही सदस्यांना भूत वगैरे दिसते, हिला देखील भूत दिसले वाटतं.
अर्चना गाैतम हिच्या या व्हिडीओवर चाहते अनेक कमेंट करत असून हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. नुकताच विकेंडचा वार झाला असून सलमान खान याने यावेळी टीना दत्ता हिचा क्लास लावला होता.