मुंबई : बिग बाॅसच्या घरात नुकताच कॅप्टनसी टास्क पार पडलाय. आता एमसी, साैंदर्या शर्मा आणि श्रीजिता डे हे घराचे नवे राजा आणि राणी बनले आहेत. बिग बाॅसच्या घरात गेल्या काही दिवसांपासून धमाल सुरू आहे. अब्दु बिग बाॅसच्या बाहेर पडला असून पुन्हा काही दिवसांनंतर तो शोमध्ये येण्याची शक्यता आहे. कॅप्टनसी टास्कमध्ये प्रियंका चाैधरी हिचा खरा चेहरा हा घरातील सदस्यांच्या समोर आला. प्रियंकाने कॅप्टनसी टास्कमध्ये तिची मैत्रिण साैंदर्या शर्मा हिला सपोर्ट न करता थेट विकासला सपोर्ट केला.
बिग बाॅसच्या घराबाहेर टीना दत्तामुळे श्रीजिता डे हिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चांगलाच पारा चढला आहे. इतकेच नाहीतर त्याने याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्टही थेट शेअर करून टाकलीये. आता श्रीजिता डे हिच्या होणाऱ्या नवऱ्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Priyanka:- “USSE BAS SYMPATHY LENI HEIN”
“Usse pata hein Archana se sympathy milegi”
Ankit:- “AGAR USSE HURT HUA, TO YE BOLNE KA KYA JARURAT THA I UNDERSTOOD” They stating the fact??#PriyAnkit #AnkitGupta #PriyankaChaharChaudhary— BIGG BOSS 16 LF (@itsvibingsoul) December 20, 2022
विकास मानकतला आणि टीना दत्ता ही बिग बाॅसच्या घरामध्ये गप्पा मारत बसले होते. यावेळी टीना ही विकास याला सांगते की, श्रीजिता डे मुंबईमध्ये नेमकी कुठे राहते. इतकेच नाहीतर थेट श्रीजिता डे राहात असलेल्या सोसायटीचे नावही टीना सांगून टाकते.
Shocked to see addresses of #BiggBoss16 HMs leaked out on National TV.. If cursing can be beeped, then why aren’t safety & privacy important enough!? #SreejitaDe won’t be happy with this, bcoz we surely don’t want the whole world to know where we live!! @ColorsTV @EndemolShineIND
— Michael BP (@imichaelbp) December 18, 2022
टीना दत्ता हिने श्रीजिता डे हिच्या सोसायटीचा पत्ता सांगितला आणि बिग बाॅसच्या निर्मात्यांनी ते म्यूट ही केले नसल्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माइकल ब्लोहम-पेप याने संताप व्यक्त केला. माइकल ब्लोहम-पेप हा श्रीजिता डे हिचा होणारा नवरा आहे.
In first pic #MCStan is wearing HINDI Wala Locket and in next pic HINDI Wala Locket is not there tho.#MCStan? #StannyArmy #BiggBoss16 #BB16 @OrmaxMedia pic.twitter.com/oxKNpipOTu
— BaLoCh (@KDBaloc00337121) December 20, 2022
नुकताच सोशल मीडियावर बिग बाॅसच्या आजच्या एपिसोडचा एक प्रोमो व्हायरल झालाय. या प्रोमोमध्ये नाॅमिनेशन टास्टमध्ये एमसी आणि शालिन भनोट यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाल्याचे दिसत आहे. आता हा प्रोमो व्हायरल होत आहे.