मुंबई : बिग बाॅसच्या घरामध्ये नुकताच नाॅमिनेशन प्रक्रिया पार पडलीये. सध्या बिग बाॅसच्या घरामध्ये दोन ग्रुप बघायला मिळतायत. बिग बाॅस हे साैंदर्या शर्मा हिला काही विशेष अधिकार देतात, याच अधिकाराचा वापर करत साैंदर्या शर्मा ही तिच्या ग्रुपमधील सदस्यांना या आठवड्यात नाॅमिनेशनपासून सुरक्षित करते. प्रियांका चाैधरी आणि अंकित गुप्ता यांना साैंदर्या वाचवते. या आठवड्यामध्ये शिव ठाकरे, साजिद खान, टीना दत्ता आणि शालिन भनोट हे नाॅमिनेट झाले आहेत.
बिग बाॅसच्या घरामध्ये दोन ग्रुप झाल्याने सातत्याने वाद सुरू आहेत. प्रियांका चाैधरी आणि अर्चना गाैतम या एकाच ग्रुपच्या असताना देखील कारण नसताना कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी सातत्याने भांडणे करत आहेत.
इतकेच नाहीतर भांडणे करून थोड्याच वेळाने या सोबत जेवताना किंवा मस्ती करताना दिसतात. या फक्त कॅमेऱ्यासाठी भांडण करत असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रियंका हिच्याकडे पाहून अर्चना म्हणते की, मी अशा मुलींना देखील सरळ करते. हे पाहून प्रियंकाला राग येतो. ती अर्चनाच्या जवळ जाते आणि म्हणते मी तुझ्या जवळ आलीये, कर आता मला सरळ…
हे ऐकून अर्चना म्हणते की, मी तुला बोलतच नाहीये…चल निघ फुटेज खाऊ नको…मला तुझ्याशी बोलायचे नाहीये. प्रियंका ही अर्चनाला बोलत असताना अर्चना म्हणते की, माझ्या पायाला बोल चल…
प्रियंका आणि अर्चना यांच्या भांडण्याची मजा, अब्दू, शिव ठाकरे, साजिद खान, निम्रत घेताना दिसत आहे. कारण या दोघी काहीच कारण नसताना भांडणे करतात आणि थोड्या वेळाने परत गप्पा मारत बसतात.
आता हाच प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घरातील सदस्य ज्याप्रकारे या दोघींच्या भांडणाची मजा घेत आहेत, तसेच प्रेक्षकही यांच्या भांडणाची मजा घेत आहेत.