Bigg Boss 16 | 2 वर्षांपासून मी याला झेलत आहे म्हणत प्रियंका हिने केला बिग बाॅसच्या घरात गौप्यस्फोट

| Updated on: Nov 02, 2022 | 9:39 AM

यावेळी शालिनला त्रास देण्याच्या नादामध्ये प्रियंका आणि अंकितमध्येच वाद झाले. मग काय प्रियंका थेट रडायलाच लागली.

Bigg Boss 16 | 2 वर्षांपासून मी याला झेलत आहे म्हणत प्रियंका हिने केला बिग बाॅसच्या घरात गौप्यस्फोट
Follow us on

मुंबई : बिग बॉस 16 चा कालचा एपिसोड एकदम जबरदस्त ठरला. नेहमीप्रमाणे विषय कोणाचाही असो प्रियंका चाैधरी त्यामध्ये बोलणार म्हणजे बोलणार हे ठरले आहे. मात्र, यावेळी शालिनला त्रास देण्याच्या नादामध्ये प्रियंका आणि अंकितमध्येच वाद झाले. मग काय प्रियंका थेट रडायलाच लागली. बिग बाॅसच्या घरात असा एकही सदस्य नसेल ज्याच्यासोबतच प्रियंकाने अजून पंगा घेतला नाही. प्रियंका विषय असो किंवा नसो…प्रत्येकासोबत भांडत आहे. आता तर प्रियंकाने चक्क अंकितसोबतच भांडणे केली आहेत.

बिग बाॅस 16 च्या घरात सध्या प्रियंका एकटी अशी सदस्य आहे, जी सर्वांसोबत भांडणे करताना दिसते. विषय कोणताही आणि कोणाचाही असो प्रियंका त्यामध्ये पडते आणि वाद निर्माण करते. शालिनच्या चिकनवरून कॅमेरासमोर जाऊन अब्दू शालिनप्रमाणे अभिनय करत बिग बाॅसकडून चिकनची मागणी करत होता. अब्दूकडे पाहून घरातील सर्वच सदस्य हसत होते.

प्रियंका देखील शालिनला चिडवताना दिसली. मात्र, हे शालिनला अजिबातच पटत नाही आणि तो प्रियंकाला म्हणतो की, एखाद्या व्यक्तीच्या हेल्थच्या प्रश्नाचा तुम्ही मजाक कसा बनू शकता? यावर प्रियंका शालिनला नाटक करत असल्याचे म्हणते आणि प्रियंका आणि शालिनमध्ये जोरदार भांडणे होतात.

यावर अंकित प्रियंकाला म्हणतो की, शालिनच्या चिकनचा विषय इथेच सोडून दे…तू विषय उगाच वाढू नकोस…तरीही प्रियंका अंकितचे न ऐकता शालिनला बऱ्याच वेळ भांडते. यावेळी अंकित प्रियंकाची साथ देत नसल्यामुळे प्रियंकाला राग येतो आणि ती अंकितलाही भांडते. त्यानंतर साजिदजवळ जाणून प्रियंका म्हणते की, मी गेल्या दोन वर्षांपासून अंकितला झेलत आहे.