मुंबई : बिग बाॅस १६ चा फिनाले जसा जवळ येत आहे, तसा घरामध्ये हंगामा होताना दिसत आहे. आता बिग बाॅसच्या घरात सात स्पर्धेक राहिले आहेत. विशेष म्हणजे या सातपैकीच एक हा बिग बाॅस १६ चा विजेता असणार आहे. अब्दु रोजिक हा बिग बाॅसच्या घराबाहेर गेलाय. शिव ठाकरे किंवा एमसी स्टॅन बिग बाॅस १६ (Bigg Boss 16) चे विजेते होतील असे अब्दु याने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच विकेंडच्या वारमध्ये अब्दु रोजिक आणि साजिद खान यांनी हजेरी लावली होती. प्रियंका चाैधरी आणि टीना दत्ता (Tina Datta) या शालिन भनोट याला बिग बाॅसच्या घरात टार्गेट करताना दिसत आहेत. इतकेच नाहीतर यांच्यामध्ये जोरदार वाद देखील झालाय. प्रियंका आणि टीना यांच्या भांडणानंतर शालिन भनोट हा शिव ठाकरे आणि एमसी जवळ रडताना देखील दिसला. धक्कादायक म्हणजे घरातील जास्त लोक हे शालिन भनोट याला बोलण्याचे टाळत आहेत.
नुकताच बिग बाॅसचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये घरामध्ये या आठवड्याचे नाॅमिनेशन पार पडल्याचे दिसत आहे. सर्वात अगोदर व्हिडीओमध्ये निम्रत काैर ही दिसत आहे.
निम्रत काैर ही टीना दत्ता हिला नाॅमिनेट करते. शालिन भनोट हा देखील टीना दत्ता हिला नाॅमिनेट करतो. यानंतर सुंबुल ताैकीर दिसते. सुंबुल ताैकीर ही प्रियंका चाैधरी हिला नाॅमिनेट करते.
प्रियंकाला सुंबुल हिने नाॅमिनेट केल्याचा राग येतो आणि त्यानंतर ती सुंबुल ताैकीर हिला भांडताना दिसते. यानंतर या दोघीमध्ये मोठा वाद होतो. यावेळी सुंबुल म्हणते की, एखादा व्यक्ती रडत असेल तर त्याची खिल्ली उडू नका.
यावर प्रियंका म्हणते की, हे चित्रपटाचे डाॅयलाॅग इथे मारू नकोस…काहीच उपयोग होणार नाही. या भांडण्याच्या दरम्यान सुंबुल ताैकीर ही अचानक बेशुद्ध होऊन जमिनीवर पडताना दिसत आहे.
प्रियंका चाैधरी हिच्यासोबतच्या भांडणामध्ये सुंबुल मजाकमध्ये पडल्याचे दिसत आहे. आता हाच प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घरातील सदस्य भांडताना देखील या प्रोमोमध्ये दिसत आहेत.