मुंबई : बिग बॉस 16 च्या घरात प्रियंका आणि अर्चनामध्ये जोरदार भांडणे झाली आहेत. काही दिवसांपूर्वी दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. मात्र, एका छोट्या गोष्टीमुळे दोघींमध्ये कडाक्याची भांडणे होतात. घरातील कोणत्याच सदस्यासोबत अर्चनाचे जमत नाही. अर्चना सर्वांसोबतच भांडणे करते. मात्र, काही दिवसांपूर्वी शिक्षा म्हणून बिग बाॅसने अर्चनाला घराचे कॅप्टन बनवले होते. बिग बाॅसच्या घराचा कॅप्टन कोणीही असो…त्याच्याशी चांगले रिलेशन प्रियंका बनवते.
Kya Priyanka ne kiya sabko clean bowled??
Be the first to catch all the action. #BiggBoss16 Before TV streaming now only on #VootSelect.@beingsalmankhan @colorstv #BiggBoss #BiggBossOnVootSelect #BB16OnVS #BiggBoss24hrsLive #PriyankaChaharChoudhary #SalmanKhan pic.twitter.com/5a3tt2tagB
— Voot Select (@VootSelect) October 31, 2022
अर्चना कॅप्टन झाल्यानंतर प्रियंकाने अर्चनासोबत मैत्री केली. प्रियंकाच्या तालावर गेल्या काही दिवसांपासून अर्चना नाचत होती. मात्र, आता दोघींमध्ये जोरदार भांडणे झाली आहेत. या दोघींची भांडणे पाहून घरातील इतर सदस्यांचा कमालीचा आनंद झाल्याचे देखील चित्र बघायला मिळत आहे. किचनमधील विषयावरून दोघींमध्ये वाद होतो.
प्रियंका आणि अर्चनाचे हे सर्व भांडण शेखर सुमनसमोरच होते. प्रियंका सर्वांसमोर म्हणते की, जोपर्यंत अर्चना किचनमध्ये आहे, तोपर्यंत मी किचनमध्ये जाणार नाही किंवा किचनमधील एकही काम करणार नाही. हिला भांडण्यासाठी कोणीच भेटत नसल्यामुळे आता ही माझ्यासोबत भांडणे करत आहे.
Archana is clearly jealous after myglamm results ? why would you bring up jug issue in front of Shekar Suman? Pari ?? Clever of Gori to bring up her issue ?#PriyankaChaharChoudhary #BB16 #BiggBoss16 #PriyAnkitpic.twitter.com/JconcJFHpi
— ? (@Rd_0701) October 31, 2022
अर्चना प्रियंकाला म्हणते की, गाैतमची चमची आहेस तू…तू किचन स्वच्छ ठेवत नाही. यानंतर तू केलेले जेवण मी खाणार नाहीये. यावर चिडून प्रियंका म्हणते की, आता काहीही झाले तरीही मी हिच्यासाठी जेवण तयार करणार नाही. यानंतर अर्चना स्वत: चे जेवण तयार करते. मात्र, गाैतम अर्चनाला किचनमध्ये यायचे नाही असे सांगतो.