मुंबई : बिग बाॅसच्या घरात सध्या फॅमिली वीक सुरू आहे. घरातील सदस्यांचे फॅमिली मेंबर बिग बाॅसच्या घरात आले आहेत. व्हायरल झालेल्या प्रोमोनुसार बिग बाॅसच्या घरात निम्रत काैरचे वडील गुरदीप सिंह येणार आहेत. वडिलांना भेटल्यानंतर निम्रत खूप भावनिक झालेली दिसत आहे. अर्चना गाैतमचा भाऊ गुलशन हा देखील बिग बाॅसच्या घरात दाखल झाला असून फुल धमाका करताना दिसत आहे. शिव ठाकरे, शालिन भनोट आणि गुलशन यांनी हटके स्टाईलमध्ये डान्स बिग बाॅसच्या घरात केला आहे. एमसी स्टॅनची आई देखील सध्या बिग बाॅसच्या घरात आहे.
बिग बाॅसच्या घरात जवळपास सर्वच सदस्यांचे फॅमिली मेंबर आल्याचे पाहून अब्दु रोजिक हा देखील खूप जास्त भावनिक झाल्याचे दिसत आहे. यावेळी एमसी स्टॅन अब्दुला विचारतो की, तुला पण तुझ्या घरच्यांची आठवण येत आहे का? यावर अब्दु म्हणतो, हो….
पण मला माहिती आहे की, माझ्या घरचे येऊ शकत नाहीत…बिग बाॅसच्या घरात आल्यानंतर निम्रतचे वडील निम्रतला काही गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करताना दिसले. मात्र, त्या गोष्टी निम्रतला अजिबात आवडलेल्या दिसत नाहीयेत.
मंडळीपासून दूर होत तू गेम खेळ असे निम्रतचे वडील तिला सांगतात. हे ऐकून निम्रत म्हणते की, ते आता माझी फॅमिली आहे. बिग बाॅसच्या घरात तुम्हाला फॅमिलीची गरज आहे.
यावर निम्रतचे वडील म्हणतात की, मग साजिद खान असे का म्हणाला वेळ आल्यावर निम्रत आपल्याला धोका देईल. वडिलांना बऱ्याच वेळ निम्रत काही गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न करते.
शेवटी निम्रतच वडिलांपासून दूर जाण्यासाठी रडत रडत उठताना प्रोमोमध्ये दिसत आहे. आता हाच प्रोमो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.