मुंबई : बिग बाॅस १६ चा फिनाले विक काही दिवसांवर आला आहे. यादरम्यान घरात मोठा हंगामा होताना दिसत आहे. टीना दत्ता ही बिग बाॅसमधून (Bigg Boss) बेघर झालीये. आता बिग बाॅसच्या घरात निम्रत काैर, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अर्चना गाैतम, प्रियंका चाैधरी, शालिन भनोट आणि सुंबुल ताैकीर हे स्पर्धेक आहेत. गेल्या एपिसोडमध्ये अर्चना गाैतम, प्रियंका, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनमध्ये मोठा हंगामा झाला होता. यानंतर किचनमध्ये काम करताना अर्चना गाैतम ही शालिन भनोट याला टार्गेट (Target) करताना दिसली. इतकेच नाहीतर यावेळी अर्चना गाैतम ही शालिन भनोट याला म्हणते की, तू माझी शायरी ऐकत नाही मग मी तुला चिकन कशाला तयार करून देत जाऊ. यावर शालिन भनोट हा अर्चना गाैतम हिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की, मुळात मला तुझी शायरी ऐकायलाच आवडत नाही.
बिग बाॅसच्या घरातील निम्रत काैर आणि अर्चना गाैतम यांच्यामधील एका संभाषणामुळे बाहेर मोठा गोंधळ निर्माण झालाय. अनेकांनी बिग बाॅसच्या निर्मात्यांना टार्गेट केले आहे. यामुळे हंगामा होताना दिसत आहे आणि बिग बाॅसच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झालीये.
किचनमध्ये अर्चना गाैतम आणि निम्रत काैर या बोलत होत्या. यावेळी अर्चना म्हणते की, शालिनमुळे टीना दत्ता आणि साैंदर्या शर्मा या बाहेर गेल्या आहेत. हा सर्वांसमोर चांगला बनून राहण्याचा प्रयत्न करतोय.
पुढे निम्रत म्हणते की, शालिनमुळे सुंबुल ताैकीरच्या वडिलांनी तिच्या चाहत्यांना म्हटले होते की, मला माझ्या मुलीला बिग बाॅसच्या घराबाहेर आणायचे आहे. तिला तुम्ही नाॅमिनेशनमधून वाचवू नका.
दुसऱ्या एका संभाषणामध्ये शालिन म्हणताना दिसत आहे की, अंकित गुप्ता आणि गाैतम विग या दोघांनाही बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यावर मालिका मिळाल्या आहेत. आता हे दोन्ही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.
जर बिग बाॅसच्या घरातील सदस्यांना बाहेरील गोष्टी काहीच माहित नसतात. तर मग अंकित गुप्ता आणि गाैतम विग यांना मालिकेमध्ये काम मिळाले आणि सुंबुलच्या वडिलांनी चाहत्यांना केलेली विनंती हे सर्व घरामध्ये असताना यांना कसे कळाले हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय.