Bigg Boss 16 | ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री बिग बाॅसच्या घराबाहेर? व्हायरल होणारा प्रोमो पाहून चाहते चिंतेत

| Updated on: Nov 12, 2022 | 11:28 AM

अर्चना शिवचा गळा पडते आणि त्याला मारण्याचा प्रयत्नही करते. यापूर्वीही गोरीला अर्चनाने मारहाण केलीये.

Bigg Boss 16 | ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री बिग बाॅसच्या घराबाहेर? व्हायरल होणारा प्रोमो पाहून चाहते चिंतेत
Follow us on

मुंबई : बिग बॉस 16 च्या घरात रोज काहीतरी नवे घडताना दिसत आहे. शिव ठाकरे आणि अर्चना गाैतममध्ये जोरदार भांडणे होतात. यावेळी अर्चना शिवचा गळा पडते आणि त्याला मारण्याचा प्रयत्नही करते. त्यानंतर बिग बाॅस अर्चनाला घराच्या बाहेर काढतात. मात्र, आजच्या विकेंड वारमध्ये सलमान खान परत एकदा अर्चनाला घराच्या आतमध्ये आणणार असल्याची चर्चा आहे. म्हणजेच काय तर नेहमीप्रमाणे बिग बाॅसचे निर्माते अर्चनाच्या चुकीवर पांघरून घालणार. यापूर्वीही गोरीला अर्चनाने मारहाण केलीये.

अर्चना परत एकदा बिग बाॅसच्या घरात येणार असल्याने या आठवड्यात नाॅमिनेशनमध्ये असलेले तीन सदस्य सुंबुल ताैकीर, प्रियंका चाैधरी आणि टीना दत्ता यापैकी एकजण घराच्या बाहेर जाणार आहे. व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये दाखवण्यात येतंय की, प्रियंका चाैधरी ही बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडणार आहे. यावेळी सलमान खान अंकितला अनेक गोष्टी सुनावताना दिसतोय.

प्रोमोमध्ये जरी प्रियंका घराच्या बाहेर पडताना दिसत आहे, तरीही अजून हे स्पष्ट होऊ शकत नाहीये की, खरोखरच प्रिंयका बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडली. एक अंदाजा लावला जातोय की, सुंबुल बिग बाॅसच्या घराबाहेर पडले. कारण गेल्या काही दिवसांपासून सुंबुलचा गेम खूप जास्त खराब सुरू आहे. बिग बाॅसच्या घरात सुंबुल काहीच करताना दिसत नाही.

अर्चना गाैतमला परत एकदा बिग बाॅसच्या घरात सलमान खान आणणार असल्याची चर्चा आता जोर धरू लागलीये. मात्र, सोशल मीडियावर शिव ठाकरेचे चाहते याला विरोधात करताना दिसत आहेत. शिव ठाकरेचा अर्चनाने थेट गळा पकडला तरीही तुम्ही तिला परत घरात कसे घेऊन शकता म्हणत चाहते संताप व्यक्त करत आहेत.