मुंबई : सलमान खानला (Salman Khan) डेंग्यूची लागण झाल्याने आता बिग बाॅसचे 16 वे सीजन काही दिवस करण जोहर (Karan Johar) होस्ट करताना दिसणार आहे. आजच्या विकेंड का वारमध्ये सलमानऐवजी करण बिग बाॅसच्या घरातील सदस्यांचा क्लास घेणार असून यामध्ये पहिलाच नंबर गोरीचा लागेल. बिग बाॅसच्या घरात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. घराचा कॅप्टन शिव ठाकरे (Shiv Thackeray) विरोधात प्रियंकाने मोर्चा वळवल्यानंतर आता 24 तासांसाठी अर्चना घराची कॅप्टन असणार आहे.
Karan ka sawaal padd gaya Priyanka par bhaari. Kya hai unhe mann ki safayi ki zaroorat? ?
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9.30 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot#BB16 #BiggBoss #WeekendKaVaar@BeingSalmanKhan pic.twitter.com/uMeRraPGQ8
— Bigg Boss (@BiggBoss) October 22, 2022
अर्चना हे बिग बाॅसच्या घरातील अत्यंत वादग्रस्त नाव आहे. अर्चना कॅप्टन कोणीही असो त्याला त्रास देते म्हणजे देतेच. अर्चनाला शिक्षा म्हणून बिग बाॅसने 24 तासांसाठी घराचा कॅप्टन बनवले आहे. मात्र, आपल्याला कॅप्टन बनले याचा आनंद अर्चनाला प्रचंड होताना दिसत आहे. यावेळी घरातील सर्वच सदस्य अर्चनाच्या कॅप्टनसी विरोधात असल्याचे चित्र घरात दिसत आहेत.
बिग बॉसने शिक्षा म्हणून अर्चनाला घराची नवीन कॅप्टन बनवले आहे. मात्र, बिग बाॅसचा हा निर्णय घरातील एकाही सदस्याला अजिबात आवडलेला दिसत नाहीये. सर्वजण अर्चनाचा विरोधात करताना दिसत आहेत. गोरी नागोरी हिने अर्चनाला अनेक प्रकारे त्रास देण्यास सुरूवात केली. मात्र, हे पाहून करण उलट गोरीवरच भडकताना दिसला.