अगोदर पकडला थेट गळा, मग टाकली टास्कमध्ये घरातील सदस्याच्या डोळ्यात हळद, वाचा अर्चना गाैतम हिचा बिग बाॅसमधील प्रवास

| Updated on: Feb 10, 2023 | 6:26 PM

इतकेच नाही तर अनेकदा काही स्पर्धेक हे बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात खोटी भांडणे करताना देखील दिसतात. बिग बाॅसचे घर असे आहे की, तिथे कोणीच एकटे राहू शकत नाही. प्रत्येकाला मित्रांची गरज असते.

अगोदर पकडला थेट गळा, मग टाकली टास्कमध्ये घरातील सदस्याच्या डोळ्यात हळद, वाचा अर्चना गाैतम हिचा बिग बाॅसमधील प्रवास
Follow us on

मुंबई : बिग बाॅसच्या घरामध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धेक सर्वांसोबत चांगले राहण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीवरून राग आला तरीही चांगले दिसण्याच्या नादात अनेकजण काहीच बोलत नाहीत. इतकेच नाही तर अनेकदा काही स्पर्धेक हे बिग बाॅसच्या (Bigg Boss) घरात खोटी भांडणे करताना देखील दिसतात. बिग बाॅसचे घर असे आहे की, तिथे कोणीच एकटे राहू शकत नाही. प्रत्येकाला मित्रांची गरज असते. इतकेच नाही तर घरातील सदस्यांसाठी बिग बाॅसकडूनही अनेक टास्क दिले जातात. यावेळी आपल्याला ग्रुपमध्ये खेळावे लागते. बिग बाॅसच्या घरात फोन, टीव्ही असे काहीच नसल्याचे गप्पा मारण्यासाठी मित्रांची गरज पडते. यामुळे घरात दाखल होणारा प्रत्येक सदस्य हा घरात किमान एक चांगला मित्र किंवा मैत्रीण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, या सर्वांना अपवाद बिग बाॅस १६ (Bigg Boss 16) ची स्पर्धेक अर्चना गाैतम ठरली आहे.

बिग बाॅसच्या घरातील सर्वच स्पर्धेकांच्या नाकीनऊ एकटा अर्चना गाैतम हिने आणले. काहीही कारण नसताना अनेकदा अर्चना गाैतम ही भांडताना दिसली. इतकेच नाही तर अर्चना अनेकदा तिच्या मित्र मैत्रिणींनाच भांडली.

अर्चना गाैतम हे बिग बाॅसच्या घरातील वादग्रस्त नाव देखील ठरले. कारण एका छोट्या भांडणा दरम्यान अर्चना गाैतम हिने थेट शिव ठाकरे याचा गळा पकडला होता. यामध्ये शिव ठाकरे याच्या गळ्याला मोठी दुखापत देखील झाली होती.

शिव ठाकरे याचा थेट गळा पकडल्याने बिग बाॅसने अर्चना गाैतम हिला घराच्या बाहेरही काढले होते. मात्र, सलमान खान याने परत एकदा अर्चना गाैतम हिला घरामध्ये आणले.

सर्वांना वाटले होते की, बिग बाॅसच्या घरातून बाहेर जाऊन परत आल्याने अर्चना सुधारली असेल मात्र, ते अजिबात झाले नाही आणि अर्चनाने काही दिवसांमध्येच घरातील सदस्यांना आपले रंग दाखवण्यास सुरूवात केली.

बिग बाॅसच्या घरात अनेकदा अर्चना गाैतम ही किचनमध्ये भांडणे करताना दिसली. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी बिग बाॅसच्या घरात सहभागी झालेल्या विकास याच्यासोबत तिने किचनमध्ये मोठे भांडणे केले होते.

बिग बाॅसच्या घरात जरी मित्रांची गरज लागल असली तरीही अर्चना गाैतम कायमच आपल्या मित्रांसोबत भांडणे करताना दिसली आहे. अनेकदा पीठ, चटणी, मीठ, हळद, दूध यावरून अर्चना गाैतम ही भांडणे केली.

फिनाले विक सुरू असताना बिग बाॅसने घरातील सदस्यांना एक टास्क दिली होता. या टास्कमध्ये अर्चना गाैतम हिने निम्रत, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांच्या डोळ्यांमध्ये निरमा, हळद आणि मीठ टाकले होते.