Bigg Boss 16 | या गोष्टीमुळे प्रियंका चाैधरीच्या वडिलांचा पार सलमान खान विरोधात चढला

| Updated on: Jan 10, 2023 | 6:04 PM

यापूर्वी सलमान खान याने बिग बाॅसच्या घरात प्रियंका चाैधरीचा अनेकदा क्लास घेतला आहे.

Bigg Boss 16 | या गोष्टीमुळे प्रियंका चाैधरीच्या वडिलांचा पार सलमान खान विरोधात चढला
Follow us on

मुंबई : बिग बाॅस 16 चांगलेच रंगात आले आहे. सध्या बिग बाॅसमध्ये फॅमिली वीक सुरू आहे. शिव ठाकरेची आई, साजिद खान याची बहीण फराह खान आणि प्रिंयका चाैधरीचा भाऊ घरामध्ये आले आहेत. आता पुढे एमसी स्टॅनची आई, टीना दत्ता हिची आई आणि अर्चना गाैतमचा भाऊ घरामध्ये दिसणार आहेत. बिग बाॅस सीजन 15 पेक्षा हे सीजन सुरूवातीपासूनच हीट होताना दिसत आहे. निर्मात्यांनी देखील हे सीजन खास करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नाहीये. यंदाच्या सीजनमध्ये सलमान खान हा देखील फुल मूडमध्ये दिसत आहे. यापूर्वी सलमान खान याने बिग बाॅसच्या घरात प्रियंका चाैधरीचा अनेकदा क्लास घेतला आहे.

प्रियंका चाैधरी बिग बाॅसच्या घरात तिचा विषय असो किंवा नसो सर्वांसोबत भांडण करताना दिसते. प्रियंकाचा आवाज देखील खूप मोठा आहे. सलमान खान याने प्रियंकाचा अनेकदा क्लास लावला आहे.

प्रियंका अनेकदा कारण नसताना किंवा एखाद्या विषय पुर्ण माहिती नसताना देखील भांडण करत बसते. मी मी प्रियंका घरात करत असल्याने सलमान याने काही दिवसांपूर्वीच प्रियंकाचा चांगलाच क्लास लावला होता.

आता प्रियंकाचा भाऊ फॅमिली वीकमध्ये बिग बाॅसच्या घरात सहभागी झालाय. यावेळी तो प्रियंकाला सांगतो की, सलमान खान तुला ओरडत असल्याने पप्पांना खूप राग येतो…एक वेळ तर पप्पा म्हणाले, हे खूपच जास्त होतंय.

आता प्रियंका आणि तिच्या भावामधील हाच संवादाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. बिग बाॅसच्या घरात फराह खान आल्याने मोठा जोश घरातील सदस्यांमध्ये आलाय. फराह खान हिला घरामध्ये पाहून साजिद खान भावनिक झाला होता.

शिव ठाकरेच्या गळ्याला लागत फराह खान म्हणाली होती की, मी बिग बाॅसच्या घरात एक भाऊ सोडून गेले होते. परंतू आता तीन भाऊ मला मिळाले आहेत. साजिद तुझी ही मंडळी भारी आहे, असेही फराह म्हणाली होती.