मुंबई : बिग बाॅस 16 चांगलेच रंगात आले असून आज विकेंड का वार होणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, सलमान खान घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास लावणार आहे. यावेळी सलमान खानच्या निशाण्यावर अर्चना गाैतम आणि शालिन भनोट असणार आहेत. अर्चनाने चक्क बिग बाॅसच्या निर्मात्यांवर चोरीचा आरोप केल्याने सलमान खानचा पारा चांगलाच चढल्याचे दिसत असून सलमान खान अर्चनाला अनेक गोष्टी सुनावतो.
बिग बाॅस 16 च्या घरातील वादग्रस्त व्यक्ती म्हणून शालिन भनोटकडे बघितले जाते. शालिन बिग बाॅस जिंकण्यासाठी घरात दाखल झाला आहे की, फक्त आणि फक्त चिकन खाण्यासाठी हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. कारण शालिन सतत बिग बाॅसकडे चिकनची मागणी करतो. घरातील सर्व सदस्यांसाठी आलेले चिकन एकटाच खाऊन टाकतो.
Full Promo ?#BiggBoss16 • #BB16pic.twitter.com/4u1LwWEloD
— ??????? (@bb16_lf_updates) November 3, 2022
शालिनचे सतत चिकन मागणे आणि त्यासाठी घरातील सदस्यांसोबत भांडणे करणे, यामुळे विकेंडच्या वारमध्ये सलमान शालिनचा क्लास घेताना दिसणार आहे. सलमान खानने बिग बाॅसच्या निर्मात्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, यापुढे शालिन भनोटला स्वतंत्र असे चिकन अजिबात द्यायचे नाही. सलमान खानचे हे बोलणे ऐकून शालिन नाराज होताना देखील दिसतो.
बिग बाॅसच्या घरात अर्चनाची बॅग मिळत नसल्यामुळे अर्चना थेट बिग बाॅसच्या निर्मात्यांवर चोरीचा आरोप करते. अर्चना म्हणते की, माझ्या 4 बॅग होत्या, मला एकही मिळत नाहीये. मला काही टेन्शन नाही पण मी तुमच्या शोचे काय करते पाहा, असे अर्चना निर्मात्यांना म्हणते. हे ऐकल्यावर सलमान खान अर्चनाला म्हणतो की, तू ज्यालोकांसोबत बसते ते कदाचित तुझे कपडे चोरत असतील, पण इथे तसे करणारे कोणीच नाहीये…असे म्हणत सलमान अर्चनाचा क्लास घेतो.