मुंबई : शालिन भनोट हा बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मधील सर्वात चर्चेत असलेला स्पर्धक आहे. शालिनच्या मागे सुंबुल ताैकीर आणि टीना दत्ता आहेत. टीना आणि सुंबुल 24 तास शालिनच्या मागे फिरतात. बऱ्याच वेळा प्रेक्षकांना हाच प्रश्न पडतो की, या दोघी बिग बॉस (Bigg Boss) खेळण्यासाठी आल्या आहेत की, शालिनसोबत राहण्यासाठी. वाद कोणताही असो शालिनची बाजू घेण्यासाठी सुंबुल आणि टीना असतातच. काही दिवसांपूर्वी टीनाने शालिनला प्रश्न (Question) विचारला होता की, सुंबुलबद्दल तुझ्या मनात नेमक्या काय भावना आहेत.
बिग बॉसच्या घरातील सदस्यांना सुंबुल आणि शालिनमध्ये काही तरी सुरू असल्याचे कायमच वाटते. मात्र, आता यामध्ये टीनाच्याही नावाचा समावेश झालाय. मात्र, यावेळी शालिन एका वेगळ्याच विषयावरून चर्चेत आलाय. शालिनला घरातील काही सदस्य आता सौंदर्याच्या नावानेही चिडवत आहेत. त्यामध्येच नुकताच शालिनने सौंदर्याला एक अशी कमेंट केलीये की, विविध चर्चांना उधाण आलंय.
शालिन थेट सौंदर्याच्या अंडरगारमेंट्सवर कमेंट करतो. मात्र, ही बाब सौंदर्याला अजिबातच आवडत नाही. सौंदर्या त्यावेळी काहीच न बोलता निघून जाते आणि शालिनने आपल्या अंडरगारमेंट्सवर कमेंट केल्याचे गौतमला सांगते. त्यावेळी गौतम तिला म्हणतो की, तुला हे आवडले नाही तर तू त्याला त्याच वेळी हे बोलणे अपेक्षित होते. यावर सौंदर्या शांत बसते. शालिन ज्यावेळी सौंदर्याच्या अंडरगारमेंट्सवर कमेंट करतो, त्यावेळी तिथे टीना देखील होती.