मुंबई : बिग बाॅस 16 च्या घरात आणि बाहेर दोन्हीकडे मोठा हंगामा बघायला मिळतोय. घरातील सदस्यांच्या निशाण्यावर सुंबुल ताैकीर खान आहे आणि बाहेर सर्वांच्या निशाण्यावर सुंबुलचे वडील ताैकीर खान हे आहेत. कारण सुंबुलच्या वडिलांनी शालिन भनोट आणि टीना दत्ता यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जात टीका केलीये. यानंतर सुंबुलच्या वडिलांविरोधात शालिनचे आई-वडिल आणि टीना दत्ताची आई मैदानात उतरलीये.
सुंबुलच्या वडिलांनी आपली तब्येत खराब आहे, असे सांगत सुंबुलला बोलण्यासाठी बिग बाॅसला विनंती केली. परंतू सुंबुलचे वडील ज्याप्रकारे बोलले. त्यावरून अजिबातच वाटले नाही की, त्यांची तब्येत खराब होती आणि त्यामुळे त्यांना सुंबुलला बोलायचे होते.
बाहेरील सर्व गोष्टी सुंबुलच्या वडिलांनी तिला सांगितल्या. इतकेच नाही तर त्यांनी शालिन आणि टीनावर एकदम खालच्या पातळीवर येत टीका केली. त्यानंतर यावर सर्वांनीच संताप व्यक्त केला. आता बिग बाॅसने शालिनचे आई-वडिल आणि टीनाची आई व सुंबुलच्या वडिलांना थेट बिग बाॅसच्या मंचावर बोलावले आहे.
Ankit’s jump ?#AnkitGupta #BiggBoss16 pic.twitter.com/zLotFAmYYU
— ??????? (@bb16_lf_updates) November 25, 2022
टीनाची आई थेट सुंबुलच्या वडिलांना म्हणते की, दुसऱ्यांच्या मुलीला नॅशनल टीव्हीवर तुम्ही कमीनी आहे, असे कसे बोलू शकतात. इतकेच नाही तर टीनाची आई म्हणते की, मी माझ्या मुलीला शाळेत पाठवले नाही तर बिग बाॅसच्या घरात पाठवले आहे.
शालिनचे वडिल सुंबुलच्या वडिलांना म्हणतात की, तुम्हाला दुसऱ्यांच्या मुलांना नाव ठेवण्याचा आणि खालच्या पातळीवर जाऊन बोलण्याचा कोणी अधिकार दिला आहे. तुम्ही तुमच्या मुलीबद्दल काय ते बोलावे आमच्या मुलांना चुकीचे तुम्ही कसे बोलू शकता?
सुंबुल आणि तिच्या वडिलांमधील संभाषण ऐकल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट निर्माण झाली होती. कारण त्यांनी टीना आणि शालिनवर टीका केली. इतकेच नाही तर त्यांनी बाहेर काय सुरू आहे, याची माहिती देखील सुंबुलला दिली होती.