मुंबई : बिग बाॅसच्या घरामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये मोठा हंगामा होणार असून श्रीजिता डे हिने वाइल्डकार्ड एन्ट्री घेतलीये. यापूर्वी श्रीजिता डे ही बिग बाॅसमध्ये सहभागी झाली होती. मात्र, बिग बाॅसच्या घरात घडलेल्या एका घटनेनंतर तिला नाॅमिनेशनमध्ये टाकण्यात आले होते आणि त्यानंतर ती बिग बाॅसच्या घराबाहेर पडली. श्रीजिता डे परत एकदा बिग बाॅसच्या घरात येणार असल्याच्या चर्चा सतत सुरू होत्या. अखेर आता श्रीजिता डे हिने बिग बाॅसच्या घरामध्ये एन्ट्री घेतलीये.
बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर श्रीजिता डे हिने अनेक मुलाखती दिल्या. यावेळी श्रीजिता ही परत एकदा बिग बाॅसच्या घरात जाण्याची इच्छा असल्याचे सांगत होती.
बिग बाॅसच्या घरात श्रीजिता डे हिला पाहून घरातील स्पर्धेकांना फार आनंद झाला नाहीये. इतकेच नाही तर श्रीजिता ही टीना दत्ता हिला म्हणते की, नकारात्मक ऊर्जा तुझ्यामध्ये दिसत आहे.
श्रीजिता हिचे बोलणे ऐकल्यावर टीना दत्ताचा पारा चांगलाच चढतो. टीना तिला म्हणते की, हे तुला वाटते आणि हा तुझा विचार आहे, हे म्हणत टीना दत्ता रागाने जाते.
बिग बाॅसच्या घरात आल्यावर टीना म्हणते बिग बाॅस तुम्हाला माझी खुशी पाहावत नव्हती ना? श्रीजिता डे घरामध्ये आल्यावर सर्वात अगोदर शालिन भनोटची गळा भेट घेते.
शालिन आणि श्रीजिता यांना सोबत पाहून टीना दत्ताचा तिळपापड होतो. आता श्रीजिता डे बिग बाॅसच्या घरात हंगामा करताना दिसणार आहे. श्रीजिता हिच्या गेममध्ये यावेळी सुधारणार होणार असल्याचे स्पष्ट आहे.