मुंबई : बिग बाॅस 16 च्या घरात मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळतंय. अर्चना गाैतमला विषय काही माहिती नसताना भांडणास सुरूवात अगोदर करते. त्यानंतर बिग बाॅस स्वत: अर्चनाला समजवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यादरम्यान अर्चना आणि शिव ठाकरेमध्ये दुपारी जोरदार वाद होतात. याचाच राग मनात ठेवत दिवसभर अर्चना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी शिव ठाकरेला टार्गेट करताना दिसते. बिग बाॅसच्या घरात अर्चना गाैतम एक वादग्रस्त नाव ठरत होते.
रात्री उशीरा बिग बाॅसच्या घरात अर्चना आणि शिवमध्ये वाद होतो. मात्र, यावेळी अर्चना थेट शिव ठाकरेवर हात उचलते आणि त्याचा गळा पकडते. यानंतर घरातील सर्वच सदस्य अर्चनाच्या विरोधात होतात. कारण बिग बाॅसच्या घरात मारहाण करणे एक गुन्हा आहे. यापूर्वीही गोरीला अर्चनाने मारहाण केली होती. मात्र, त्यावेळी बिग बाॅसने अर्चनाला पाठीशी घातले होते. व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, अर्चना शिवला मारते आहे, हा प्रोमो पाहून शिव ठाकरेच्या चाहत्यांचा चांगलाच पारा चढलाय.
विशेष म्हणजे शिव ठाकरेवर हात उचलल्यामुळे अर्चनाला बिग बाॅसने घराच्या बाहेर काढले आहे, याचा एक प्रोमोही सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. शिव ठाकरेच्या गळ्यावर अर्चनाचे नख लागले असून शिवला जखम झाल्याचे देखील दिसत आहे. प्रोमोमध्ये सर्व गोष्टी अजून बिग बाॅसच्या निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आल्या नाहीयेत. मात्र, येणाऱ्या एपिसोडमध्ये हा वाद काय होता आणि नेमके काय घडले हे स्पष्ट होईल.