Bigg Boss 16 | अखेर अनेक वादानंतर विकास मानकतला बिग बाॅसमधून बाहेर

| Updated on: Dec 31, 2022 | 6:29 PM

बिग बाॅसच्या घरात दोन दिवसांपूर्वीच विकास मानकतला आणि अर्चनामध्ये जोरदार वाद झाला होता.

Bigg Boss 16 | अखेर अनेक वादानंतर विकास मानकतला बिग बाॅसमधून बाहेर
Follow us on

मुंबई : बिग बाॅसच्या घरात गेल्या तीन दिवसांपासून मोठा हंगामा होताना दिसत आहे. घरातील सदस्य जोरदार भांडणे करत आहेत. विषय कोणाचाही असो कायमच प्रियंका चाैधरी ही भांडणासाठी तयार असते. नुकताच विकेंडच्या वारमध्ये सलमान खान हा शालिनला काही गोष्टी विचारतो. जेवताना शालिन भनोट भाजी घेत असताना अर्चना म्हणाली होती की, थोडी कमी भाजी घे सर्वांना पुरायला हवी. यावर शालिन भनोट अगोदर काही बोलत नाही. परंतू प्रियंका येऊन हा विषय वाढवते आणि भांडण्यास सुरूवात करते.

बिग बाॅसच्या घरात दोन दिवसांपूर्वीच विकास मानकतला आणि अर्चनामध्ये जोरदार वाद झाला होता. यामुळे अर्चनावर अगोदरच विकास हा चिडला होता. किचनमधील भांडणामध्ये मग विकास मानकतला याने देखील उडी घेतली.

या आठवड्यातील नाॅमिनेशनमध्ये टीना दत्ता, शालिन भनोट, प्रियंका चाैधरी, निम्रत काैर, विकास मानकतला, श्रीजिता डे आणि सौंदर्या शर्मा होते. रिपोर्टनुसार या नाॅमिनेशनमध्ये विकास मानकतला हा बेघर झाला आहे.

बिग बाॅसच्या घरात वाइल्डकाॅर्ड म्हणून विकास मानकतला याने प्रवेश केला होता. परंतू बिग बाॅसच्या घरात धमाका करण्यात त्याला यश मिळाले नाही. इतकेच नाहीतर बिग बाॅसच्या घरात पहिल्याच दिवशी त्याने घरातील सदस्यांसोबत पंगा घेतला होता.

विकास मानकतला हा बिग बाॅसच्या घरात सहभागी होताना मोठे दावे करत होता. परंतू घरात दाखल होताच तो प्रियंका चाैधरी, शालिन भनोट, टीना दत्ता यांच्या ग्रुपमध्ये सहभागी झाला. विकास मानकतला बेघर झाल्याची चर्चा आता चाहत्यांमध्येही सुरू आहे.