‘बिग बॉस’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीवर हल्ला, बहिणीच्या नवऱ्यावर केला गंभीर आरोप; व्हिडीओ शेअर

| Updated on: May 26, 2023 | 6:39 AM

बिग बॉस फेम अभिनेत्री गोरी नागौरीवर हल्ला झाला आहे. तिच्या जीजाजीने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप तिने केला आहे. गोरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ आणि पोस्ट शेअर करत हा आरोप केला आहे.

बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्रीवर हल्ला, बहिणीच्या नवऱ्यावर केला गंभीर आरोप; व्हिडीओ शेअर
Gori Nagori
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

जयपूर : राजस्थानची शकीरा म्हणून प्रसिद्ध असलेली डान्सर आणि बिग बॉस फेम अभिनेत्री गोरी नागौरीवर हल्ला झाला आहे. तिच्या बहिणीच्या नवऱ्याने मित्रांसोबत मिळून तिला बेदम मारहाण केली. तसे आरोपच गोरीने लावला आहे. गोरीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वीच तिने हा व्हिडीओ शेअर करून बहिणीच्या नवऱ्यावर गंभीर आरोप केला आहे.

हे सुद्धा वाचा

गोरी नागोरीने 24 मे रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत बहिणीच्या नवऱ्यावर हा आरोप केला आहे. जीजाजीने माझ्याविरोधात षडयंत्र रचून मला किशनगडला बोलावून घेतलं. त्यानंतर मला प्रचंड मारहाण केली. या मारहाणीनंतर मी पोलिसांकडे गेले. पण पोलिसांनी माझी तक्रार घेतली नाही, असा गंभीर आरोपही गोरीने केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या बेपर्वाईवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

बोलावून घेऊन हल्ला केला

मारहाणीची घटना 22 मे रोजी घडली. त्यानंतर दोन दिवसाने म्हणजे 24 मे रोजी तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकून तिच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली. माझ्या बहिणीचं लग्न होतं. मला वडील नाही आणि भाऊही नाहीये. माझ्या जीजाजीने बहिणीला किशनगडमध्ये लग्न करण्यास सांगितले. पण किशनगडला बोलावणं हा एक षडयंत्राचा भाग आहे हे मला माहीत नव्हतं. मी किशनगडला आल्यावर माझ्यावर आणि माझ्या टीमवर हल्ला करण्यात आला. माझ्या जीजाजीने आणि त्यांच्या भावाने तसेच मित्रांनी हा हल्ला केला, असं तिने म्हटलंय.

 

पोलिसांनी तक्रारच घेतली नाही

या मारहाणीनंतर गोरी पोलीस ठाण्यात गेली होती. पण पोलिसांनी हे कौटुंबीक भांडण असल्याचं सांगून तक्रार नोंदवण्यास नकार दिला. आपसात वाद मिटवून घ्या, असा सल्लाही पोलिसांनी दिल्याचं तिचं म्हणणं आहे. या व्हिडीओत गोरीने काही लोकांचं नाव घेतलं आहे. तसेच या लोकांपासून आपल्या जीवाला धोका असून मला आणि माझ्या टीमला काहीही झाल्यास त्याची जबाबदारी या लोकांवर असेल, असंही तिने म्हटलं आहे.

मला न्याय द्या

पोलीस तक्रार घेत नाही म्हणून गोरीने राजस्थान सरकारकडे धाव घेतली आहे. मला सहकार्य करावं ही राजस्थान सरकारला माझी विनंती आहे. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. मला न्याय हवा आहे, असं गोरीने म्हटलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. त्यावर नेटकऱ्यांनीही प्रचंड प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.