Bigg Boss Marathi Season 5 Winner: बिग बॉसमधील विजेता ठरताच सूरज चव्हाण याला किती पैसे मिळाले, सोबत असाही झाला फायदा

| Updated on: Oct 07, 2024 | 10:10 AM

bigg boss marathi season 5 winner prize money: सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठीतील विजेत्यामुळे १४ लाख ६० हजार रुपये मिळाले. तसेच पु ना गाडगीळ ज्वेलर्सकडून दहा लाख रुपये मिळाले. तसेच सूरज चव्हाण याला एक स्कूटर मिळाली. तसेच एका चित्रपटाची ऑफरसुद्धा मिळाली.

Bigg Boss Marathi Season 5 Winner: बिग बॉसमधील विजेता ठरताच सूरज चव्हाण याला किती पैसे मिळाले, सोबत असाही झाला फायदा
Suraj Chavan
Follow us on

‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा रविवारी फिनाले झाला. या संपूर्ण सीजनमध्ये ग्रामीण भागातील सूरज चव्हाण यांने आपली छाप पाडली. रिल स्टार असलेल्या सूरज चव्हाण हा यापूर्वीच गावा गावात सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचला होता. परंतु बिग बॉस मराठीमुळे तो मराठी घरा घरापर्यंत पोहचला. 28 जुलै रोजी सुरु झालेला बिग बॉसमधील सूरज चव्हाण याचा यशस्वी प्रवास 70 दिवसांनी 6 ऑक्टोबर रोजी संपला. यानंतर सूरज चव्हाण याच्यावर बक्षिसांची खैरात झाली. सोबत त्याला चित्रपटात कमा करण्याची ऑफर मिळाली.

काय, काय मिळाले सूरजला

सूरज चव्हाण याला बिग बॉस मराठीतील विजेत्यामुळे १४ लाख ६० हजार रुपये मिळाले. तसेच पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सकडून दहा लाख रुपये मिळाले. तसेच सूरज चव्हाण याला एक स्कूटर मिळाली. तसेच एका चित्रपटाची ऑफरसुद्धा मिळाली.  प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला चित्रपटाची ऑफर दिली.

हे होते स्पर्धेक

बिग बॉस 5 चा विजेतपदासाठी सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांच्यामध्ये स्पर्धा होती. फिनाले दरम्यान, सूरज चव्हाण आणि अभिजीत सावंत टॉप 2 मध्ये राहिले. अभिजीत सावंत हा एक सुप्रसिद्ध गायक आणि इंडियन आयडॉलचा पहिला विजेता होते. त्याला सूरजने मागे टाकून विजेतेपद मिळवले. अभिजित उपविजेता ठरला. अभिजीतने संपूर्ण सीझनमध्ये आपला करिष्मा दाखवला.

हे सुद्धा वाचा

आता सूरजचे उत्पन्न किती

सूरज चव्हाण बारामती तालुक्यातील आहे. घरच्या परिस्थितीमुळे लोकांकडे 300 रुपये मुजरीवर सूरज चव्हाण जात होतो. परंतु त्याच्या नशिबात वेगळेच काही होते. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ केल. तो प्रचंड लोकप्रिय झाला. मग तो रिलस्टार झाला आहे. आता इंस्टाग्राम प्रोमोशन आणि यूट्यूब हे उत्पनाचे प्रमुख साधन आहे. तो अनेक ठिकाणी कार्यक्रमांच्या उदघाटन समारंभसाठी जात असतो. त्यासाठी तो 40-50 हजार रुपये मानधन घेतो. त्याला आता चित्रपटही मिळू लागले आहे. आज सर्व गोष्टीतून महिन्याला लाखो रुपये सूरज कमवत आहे.