Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुख याने मागितली महाराष्ट्राची हात जोडून माफी, अखेर…

| Updated on: Oct 07, 2024 | 10:11 AM

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : गेल्या दोन आठवड्यापासून रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी सीजन 5’मध्ये नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शोला टीआरपी मिळत नाही, त्यामुळे रितेश देशमुख बाहेर पडल्याचे म्हटले जात होते. परंतु या सर्व चर्चांना रितेश देशमुख याने पूर्णविराम दिला.

Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुख याने मागितली महाराष्ट्राची हात जोडून माफी, अखेर...
riteish deshmukh bigg boss
Follow us on

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale Winner : ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा रविवारी फिनाले झाला. या संपूर्ण सीजनबद्दल मराठी चाहत्यांमध्ये चांगली क्रेझ होती. या सीजनमध्ये वर्षा उसगांवकर, पॅडी कांबळे यांच्यासारखे बडे कलाकार सहभागी झाले. त्यामुळे बिग बॉस मराठीची चर्चा अधिकच रंगली. या शोमध्ये स्पर्धकांमध्ये प्रचंड वाद विवाद झाले. बिग बॉसकडून दिलेल्या टास्कमुळे स्पर्धकांमध्ये जोरदार भांडणे झाली. यामुळे काही वेळा टास्क रद्द करावे लागले. या शोला रितेश देशमुख याने एक वेगळेच वलय प्राप्त करुन दिले. पहिल्यांदा हॉस्ट म्हणून रितेश देशमुख यांने आपली छाप शोमध्ये पाडली. मराठी प्रेक्षकांना रितेश देशमुख याचा मराठमोळेपणा चांगलाच भावला. रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये रितेश देशमुख याने महाराष्ट्राची माफी मागितली. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या त्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.

का मागितली रितेश देशमुख याने माफी

गेल्या दोन आठवड्यापासून रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी सीजन 5’मध्ये नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या होत्या. शोला टीआरपी मिळत नाही, त्यामुळे रितेश देशमुख बाहेर पडल्याचे म्हटले जात होते. परंतु या सर्व चर्चांना रितेश देशमुख याने पूर्णविराम दिला. आपण दोन आठवडे चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी विदेशात गेलो होते. त्यामुळे या शोमध्ये सहभागी होऊ शकलो नाही. मी सर्व महाराष्ट्राची माफी मागतो, असे रितेश देशमुख याने शोमध्ये सांगितले.

काय म्हणाला रितेश देशमुख

गेल्या दोन आठवड्यांपासून मी भाऊच्या धक्क्यावर उपस्थित राहू शकला नव्हता. हा शो माझ्या खूप जवळचा आहे. मला सर्वांनी दोन आठवडे समजून घेतले. यासाठी मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागतो. आता मी माझे विदेशात सुरु असलेले शूटिंग थांबवून खास आजच्या सोहळ्यासाठी येथे आलो आहे, असे रितेश देशमुख याने सांगितले.

हे सुद्धा वाचा

रितेशचा संपूर्ण प्रवास दाखवला

‘बिग बॉस मराठी सीजन 5’ शो मराठी घराघरपर्यंत पोहचवण्यात रितेश देशमुख याचा महत्वाचा वाटा होता. त्यामुळे ग्रँड फिनालेमध्ये रितेश देशमुख याचा संपूर्ण प्रवास दाखवला. यापूर्वी चार सीजनमध्ये महेश मांजरेकर याने होस्ट केले होते. पाचव्या सीजनमध्ये तो नव्हता. परंतु त्याची कमतरता रितेश देशमुख याने जाणवू दिली नाही.