वर्षा उसगांवकर यांच्यासोबत मोठा घात, अभिनेत्रीने अनेक प्रयत्न करूनही…

| Updated on: Sep 21, 2024 | 1:13 PM

अभिनेत्री वर्षा उसगांवकर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. वर्षा उसगांवकरची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. वर्षा उसगांवकर यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. वर्षा उसगांवकर आता बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये धमाल करताना दिसत आहेत.

वर्षा उसगांवकर यांच्यासोबत मोठा घात, अभिनेत्रीने अनेक प्रयत्न करूनही...
Varsha Usgaonkar
Follow us on

बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये मोठा हंगामा बघायला मिळतोय. विशेष म्हणजे हे सीजन धमाल करत आहे. या सीजनची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ देखील बघायला मिळतंय. अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये सहभागी झाले. पहिल्यांदाच बिग बॉस मराठीला होस्ट करताना रितेश देशमुख दिसतोय. लोकांना रितेश देशमुखची खास स्टाईल आवडताना देखील दिसत आहे. या सीजनकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा बघायला मिळत आहेत. वैभव हा बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. आता बिग बॉसने घरातील अनेक नियम हे बदलले आहेत.

नुकताच बिग बॉसच्या घरात कॅप्टनशीचा टास्क हा पार पडलाय. यावेळी घरातील सदस्य धमाकेदार गेम कॅप्टन होण्यासाठी खेळताना दिसले. अरबाज पटेल हा परत एकदा बिग बॉसच्या घराचा कॅप्टन बनलाय. विशेष म्हणजे यावेळी त्याला निकी तांबोळी आणि जान्हवी किल्लेकर यांनी सपोर्ट केला. यावेळी वर्षा उसगांवकर यांना त्यांच्या टीमने धोका दिल्याचे बघायला मिळाले. अंकिता, पॅडी कांबळे, अभिजीत सावंत, सुरज, धनंजय पोवार आणि वर्षा उसगांवकर हे एकाच टीममधील सदस्य आहेत.

सुरूवातीच्या काळापासून हे सर्वजण एकत्र गेम खेळताना दिसले. मात्र, आता या टीममधून वर्षा उसगांवकर या बाहेर पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. कॅप्टनसीच्या टास्कमध्ये यांनी कोणीही वर्षा उसगांवकर यांची साथ दिली नाही. टास्कमध्ये वर्षा उसगांवकर यांच्याकडून कोणीही पाण्याची खरेदी केली नाही. यामुळे यांच्यातील वाद आता पुढे आलाय. हेच नाही तर अंकिता हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, मी मुद्दाम वर्षा ताईंचे पाणी घेतले नाही.

कारण त्यांनी अगोदरच काही योजना तयार केली. आता त्यांना काहीही वाटो आणि काहीही दिसो आता असेच वागायचे. टास्कमध्येच अभिजीत आणि पॅडी कांबळे हे वर्षा उसगांवकर यांच्याकडे बोलण्यास जातात. यावेळी वर्षा उसगांवकर आपली बाजू समजून सांगताना दिसतात. मात्र, त्यांच्याच टीममधील सदस्य त्यांचे काहीच ऐकत नसल्याचे बघायला मिळाले.

सध्या वर्षा उसगांवकर आणि निकी तांबोळी यांचे बिग बॉसच्या घरात चांगले जमताना दिसत आहे. पुढील काही दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरात नक्कीच नवीन काही समीकरणे देखील बघायला मिळू शकतात. वर्षा उसगांवकर यांना त्यांच्याच टीममधील सदस्यांनी धोका दिल्याने त्या कॅप्टनसी पदापासून दूर राहिल्या.