मुंबई : बिग बाॅसने या आठवड्यामध्ये मोठा गेम प्रेक्षकांसोबत आणि घरातील सदस्यांसोबत खेळला आहे. नाॅमिनेशलमध्ये असलेली टीना दत्ता घराच्याबाहेर पडलीये. टीना दत्ता हिचा खास मित्र शालिन भनोटला बिग बाॅस एक संधी देतात. टीना आणि सुंबुल यांना वाचवण्याची परंतू शालिन बजर दाबत नाही. यामुळे टीना दत्ता ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडली असे दाखवण्यात आले. परंतू नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बाॅस परत एका शालिन भनोट याच्या हातामध्ये मोठा निर्णय देतात.
बिग बाॅस शालिन भनोट याला म्हणतात की, टीना दत्ता हिला परत एकदा घरामध्ये आणण्याची संधी मी शालिन भनोट याला देतो. जर त्याने हे बजर दाबले तर टीना दत्ता ही बिग बाॅसच्या घरामध्ये परत येईल.
यावेळी शालिन कोणाचाही विचार न करता बजर दाबतो आणि म्हणतो की, जो कोणी जिंकेल त्याला मी 25 लाख देतो. कारण हे बजर दाबल्यामुळे बिग बाॅस विजेत्याच्या प्राईज मनीमधून 25 लाख जाणार आहेत.
Tina is backk and bajoinggg shalinnn ?????#Bb16 #biggboss #TinaDatta #ShalinBhanot? pic.twitter.com/2hjGtIscBL
— Tejran ? (@TejRan_aka_adi) December 10, 2022
शालिन भनोट हे बजर दाबतो आणि टीना दत्ता हिला बिग बाॅसच्या घरात परत एकदा आणतो. मात्र, टीना घरामध्ये आल्यावर मोठा धमाका करते आणि शालिन भनोट याला म्हणते की, तू फेक आहे.
तुला अगोदरच माहिती होते की, मी घराच्या बाहेर पडणार आहे. मग तू इतका वेळ काल का लावला विचार करण्यासाठी आणि आज का तू लगेचच बजर दाबले. तू सर्व काही गेमसाठी करत आहेस, हे मला कळाले आहे.
मी बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यावर तू मस्त गाणे म्हणत डान्स करत होता. टीनाचे हे बोलणे ऐकून शालिन भनोट याला धक्का बसतो. टीना शालिनला म्हणते की, तू फेक आहेस. टीनाला परत एकदा घरामध्ये पाहून घरातील सदस्यांना देखील धक्का बसतो.