मुंबई : रिअॅलिटी शो बिग बॉस 16 (Bigg Boss 16) मधून प्रेक्षकांना जबरदस्त असे मनोरंजन होत आहे. श्रीजिता डे काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलीये. मात्र, श्रीजिता बाहेर बिग बॉस (Bigg Boss) खेळत आहे. घरातील सदस्यांवर आरोप करणे असो किंवा निर्मात्यांवर काही भाष्य करणे असो हे सातत्याने घराच्या बाहेर येऊन श्रीजिता करताना दिसत आहे. गोरी आणि श्रीजिताचा मोठा वाद (Dispute) घरामध्ये झाला होता, त्यावेळी श्रीजिताने गोरीचा क्लास काढला होता. त्यानंतर घराचा त्यावेळीचा कॅप्टन गाैतमने श्रीजिताला दोषी ठरवत नाॅमिनेशनमध्ये टाकले होते.
बिग बॉस 16 चा सध्या तिसरा आठवडा सुरू आहे. शिव ठाकरे हा बिग बॉसच्या घरातील कॅप्टन आहे. मात्र, प्रियंकाला कॅप्टन व्हायचे असल्याने प्रियंकाने शिवला त्रास देण्यासाठी मोर्चा सुरू केलाय. यामध्ये नेहमीप्रमाणेच अर्चनाने देखील उडी घेतलीये. या दोघी बिग बॉस घरात सतत झोपत आहेत, इतकेच नाही तर प्रियंका आपले काम देखील व्यवस्थित करताना दिसत नाहीये.
घराच्या कॅप्टनने प्रियंका आणि अर्चनाला झोपू नका आणि त्यांना अनेकदा उठवण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, प्रियंका आणि अर्चनाने आपली मनमर्जी करणे सोडले नसल्याने बिग बाॅसने या दोघींना शिक्षा देण्याचा आदेश दिला. त्यानंतर स्वत: बिग बाॅसने अर्चनाला शिक्षा देत 24 तासांसाठी तिला घराचा कॅप्टन बनवले आहे.
बिग बाॅसने घराचा कॅप्टन आपल्याला बनवल्याने अर्चनाचा आनंद गगणात मावत नव्हता. मात्र, बिग बाॅसने तिला सांगितले की, ही तुझ्यासाठी शिक्षा आहे. मात्र, तरीही अर्चनाला काहीच फरक पडला नाही. अर्चनाला कॅप्टन बनवल्यामुळे तिच्या विरोधात सर्व घरातील सदस्य झाल्याचे चित्र देखील बघायला मिळाले.