मुंबई : बिग बॉस 16 च्या घरात रोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सौंदर्या आणि गौतम यांच्या रिलेशनवर सातत्याने प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. बिग बाॅसच्या घरातील आणि बाहेरही लोकांना हे दोघे प्रेमाचे नाटक फक्त आणि फक्त शोमध्ये टिकून राहण्यासाठी करत असल्याचे वाटत आहे. विशेष म्हणजे अनेकदा यावर स्वत: गाैतमनेही भाष्य केले. तो शालिनजवळ म्हणाला होता की, बिग बाॅसच्या घरात टिकण्यासाठी लव्ह अॅंगल करणे गरजेचे आहे. येणाऱ्या भागामध्ये बिग बाॅस शालिनचा क्लास घेतलाना दिसणार आहेत.
शालिन नेहमीप्रमाणे बिग बाॅसला कॅमेऱ्यासमोर येत चिकन मागतो. यावेळी बिग बाॅस शालिनला स्पष्ट सांगतात की, तुला वेगळे चिकन आता यानंतर दिले जाणार नाहीये. तुला जे चिकन लागते ते अगोदरच घरामध्ये पाठवण्यात आले आहे. हे ऐकून काही वेळ शालिनला टेन्शन येते. कारण टास्क जे सदस्य जिंकले त्यांनी आलेले राशन वाटले आहे आणि त्यामध्येच चिकन आले होते.
बिग बाॅसने घरात पाठवलेले चिकन फक्त शालिसाठी नसून घरातील सर्व सदस्यांसाठी आहे. हे चिकन सध्या शिव ठाकरेच्या रूममध्ये आहे. शालिनला दररोज 150 ग्राम चिकन लागते. शरीराला प्रोटीन मिळण्यासाठी शालिन बिग बाॅसच्या घरात सतत चिकन खाताना दिसतो.
Shiv to abdu: iski kya duty btai kaptaan!! ??
Mtlb abdu is the new captain of the house fo sure!! ❤️?#ShivThakare #AbduRozik #Shibdu#Biggboss16 pic.twitter.com/CKreBu6JNU— NirVana? (@Khayaalii) November 3, 2022
शालिन घरातील सदस्यांना चिकन मागतो. मात्र, ऐवढे चिकन त्याला एकट्याला देऊ शकत नसल्याचे घरातील सदस्य सांगतात. कारण हे चिकन बिग बाॅसने सर्वांसाठी पाठवले आहे. यामुळे घरात काही वेळ वाद होतो. यावेळी अर्चना म्हणते की, बिग बाॅसने घरात असा व्यक्ती पाठवला आहे की, तो सतत चिकनच मागतो, याला घराच्या बाहेर काढा. बाहेर इतके जास्त कलाकार असताना या व्यक्तीला बिग बाॅसने कशासाठी घरात आणल्याचे देखील अर्चना म्हणते.