मुंबई : राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी यांनी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर यांच्या लग्नाची काही फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत. इतकेच नाही तर एका फोटोमध्ये त्यांच्या हातामध्ये मॅरेज सर्टिफिकेट देखील दिसत आहे. राखी सावंत हिने गुपचूप लग्न केल्याचे सांगितले जात असतानाच आता राखीचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी याने धक्कादायक दावा केल्याने मोठी खळबळच उडालीये. राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यापासून चाहते राखीला शुभेच्छा देताना देखील दिसत आहेत. मात्र, यासर्व आनंदावर विरजण पडले आहे.
बिग बाॅस मराठीमध्ये नुकताच धमाका करून राखी सावंत ही बाहेर आलीये. बिग बाॅस मराठी असो किंवा हिंदी राखी स्पर्धेक म्हणून सहभागी होत घरामध्ये मोठा हंगामा करते.
सोशल मीडियावर राखीच्या लग्नाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये राखी आणि आदिल यांनी वरमाळा घातलेल्या दिसत आहेत. मात्र, आता राखीसोबत लग्न झाले नसल्याचा दावा आदिल दुर्रानी याने केला आहे.
जूम एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार आदिल याने राखीसोबत लग्न केल्याच्या रिपोर्टला नकार दिला आहे. दुसरीकडे राखी हिने इंस्टा स्टोरीवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. आता खरोखरच राखी आणि आदिलचे लग्न झाले की नाही? याची चर्चा रंगत आहे.
बऱ्याच दिवसांपासून राखी सावंत आणि आदिल दुर्रानी रिलेशनशिपमध्ये आहेत. इतकेच नाहीतर बिग बाॅस मराठीमध्येही आदिल राखी हिला भेटण्यासाठी गेला होता. अनेकदा दोघेसोबत स्पाॅट देखील होतात.
यापूर्वी रितेश याच्यासोबत राखीचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र, यांचे नाते फार काळ टिकू शकले नव्हते. रितेश याने धोका दिल्याचे राखी सावंत हिने यापूर्वी अनेकदा सांगितले आहे.