मुंबई : ‘चीकू की मम्मी दूर की’ (Chikoo Ki Mummy Durr Kei) या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून, चाहते स्टार प्लसच्या या नवीन मालिकेची आतुरतेनं वाट पाहत होते. सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या या मालिकेच्या प्रोमोनं मालिकेबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचवली होती.
मालिकेचे निर्माते दर्शकांना आणखी एक आश्चर्याचा सुखद धक्का देण्याच्या तयारीत असून कदाचित आणखी एक दिग्गज कलाकार मालिकेत एंट्री घेताना दिसू शकेल. ताज्या बातमीनुसार निर्माते प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन यांना मालिकेत आणण्याची योजना बनवत आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्यासाठी ओळखली जाणारी गुणी अभिनेत्री सुधा चंद्रन या मालिकेत एक कैमियो करताना पाहता येईल.
दोन डान्सिंग स्टार येणार एकत्र
सुत्रांच्या म्हणण्यानुसार, “सुधा चंद्रन टेलीव्हिजन उद्योगातील एक लोकप्रिय चेहरा आहे ज्या आपल्या असाधारण अभिनय आणि नृत्यासाठी ओळखल्या जातात. या मालिकेत नृत्याचे सुंदर एलिमेंट असून सुधाजींचा नृत्याशी सरळ संबंध असल्यानं त्या निश्चितपणे यातील कैमियोसाठी एक आदर्श व्यक्ती असतील. या बाबतत चर्चा सुरू असून दोन डान्सिंग स्टार चीकू आणि सुधा जी एकत्र येतील, तेव्हा तो शानदार नजारा असेल हे पाहणे अधिक मनोरंजक ठरणार आहे.”
‘चिकू की मम्मी दूर की’ मालिकेसाठी ‘मम्मी’ची खास तयारी
मालिकांचे अनेक प्रोमो आपण पाहिले आहेत, पण अलीकडच्या ‘चिकू की मम्मी दूर की’च्या प्रोमोमध्ये लिजेंड मिथुन चक्रवर्ती यांच्या उपस्थितीमुळे चार चांद लागले असून प्रेक्षक आता चीकू आणि त्याची आई पुन्हा एकत्र कसे येतील याबद्दल अंदाज बांधत आहेत. या मालिकेत परिधी शर्मा आईची भूमिका साकारत आहे आणि नेहमीप्रमाणे, ती तिचे ऑन-स्क्रीन पात्र नुपूर साकारण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. परिधीचे या मालिकेसोबत वेगळे नाते आहे कारण ती एक रिअल लाईफ आई देखील आहे. चाहत्यांना तिचे हे रूप नक्कीच आवडेल कारण तिने या भूमिकेच्या तयारीसाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. तिच्या व्यक्तिरेखेच्या तयारीबद्दल विस्ताराने, सांगताना परिधीने स्पष्ट केले की, “या भूमिकेसाठी शास्त्रीय नृत्य शिकणे माझ्यासाठी एक कठीण पाऊल होते! विशेषतः मुद्रा. कारण त्यात तुम्ही चूक करूच शकत नाही. आणि यासाठी माझ्या बालपणातील मेंटरचे मी आभार मानते. जी माझी तारणहार बनली आणि मला योग्य मुद्रांसह उत्कृष्ट शास्त्रीय नृत्य करण्याचा आत्मविश्वास दिला. तिच्या माझ्यावरील विश्वासाने मला माझ्या मुलीबरोबर शास्त्रीय नृत्याचा सराव करण्यास प्रोत्साहित केले. मी खरोखरच धन्य झाले आहे आणि आमच्या ‘चीकू की मम्मी दूर की’ या मालिकेबाबतच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आतुर आहे.”
संबंधित बातम्या
He Ganaraya : बाप्पाचं आगमन होणार धुमधडाक्यात, ‘हे गणराया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला