मुंबई : आपल्या मजेदार स्टाईलने सर्वांना हसवणाऱ्या भारती सिंहने (Bharti Singh) नुकताच असा अनुभव सांगितला की, तो ऐकून तिचे चाहतेही स्तब्ध होतील. वास्तविक, नुकतीच भारती मनीष पॉलच्या नवीन शोमध्ये पोहोचली होती. या दरम्यान भारतीने तिच्या वैयक्तिक ते व्यावसायिक जीवनापर्यंतचे अनेक खुलासे केले. सुरुवातीला कार्यक्रम समन्वयक तिच्याशी कसे गैरवर्तन करायचे, हे भारतीने सांगितले. ती म्हणाली, ‘बर्याच वेळा जे कार्यक्रमाचे संयोजक होते ते चुकीचे वागत असत. माझ्या पाठीवर हात फिरवायचे. मला ते अजिबात आवडत नव्हतं, पण नंतर असं वाटायचं की ते माझ्या काकांच्या वयाचे आहेत, मग ते असं का वागतील.’
भारतीने म्हणते की, आता तिला समजले आहे की ते सर्व चूक होतं. ती म्हणाली, ‘त्यावेळी मला या सर्व गोष्टी समजल्या नाहीत. या व्यतिरिक्त आता माझ्यात जो आत्मविश्वास आहे तो यापूर्वी कधीही नव्हता. आता मी बेधडकपणे म्हणू शकते की, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय पहाताय, बाहेर जा, वैगरे…पण त्यावेळी माझ्यात ही हिंमत नव्हती.’
भारतीने तिचे बालपण आणि तिच्या आईने कठीण काळात कशा प्रकारे समाजाचा सामना केला याबद्दलही सांगितले. भारती म्हणाल्या, ‘काही लोक एकदम घरात शिरले आणि त्यांनी कर्ज परताव्याचे पैसे कसे मागितले, हे मी पाहिले आहे. ते अगदी माझ्या आईचा हात धरायचे. ते तिच्याशी वाईट वागतायत, हे मला त्यावेळी माहित नव्हते. एकदा कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला, मग आई चिडून म्हणाली की, तुला लाज वाटली नाही का? मला नवरा नाही पण लहान मुले आहेत, म्हणून तुम्ही असं कराल का?’ भारती म्हणाली की, त्यावेळी तिची आई केवळ 24 वर्षांची होती.
भारतीने सांगितले की, बालपणात तिला आणि तिच्या कुटुंबियांना बर्याच समस्यांचा सामना करावा लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई व बहिण एका कारखान्यात काम करत आणि एका दुकानात भाऊ काम करायचा. याशिवाय त्याची आई इतरांच्या घरी जेवण बनवायची. बऱ्याच वेळा असे घडायचे की, स्वतःच्याच घरात भाजीपालासुद्धा नसायचा. भारती म्हणाली, आम्ही कोरी चहा, रोटी आणि मीठ खाऊन झोपायचो.
भारती पुढे म्हणाली की, तिची आई शिवणकाम करायची. घरात नेहमीच मशीन चालण्याचा आवाज यायचा. आजही जेव्हा ती सेटच्या कॉस्ट्यूम रूममध्ये जाते, तेव्हा ती यंत्राचा आवाज ऐकून घाबरते. ती म्हणाली, ‘मी या आवाजामध्ये 21 वर्षे राहिलेय आणि आता मला त्या आवाजाकडे परत जाण्याची इच्छा नाही. आम्ही मीठ-चपाती खाल्ली, पण आज डाळ, भाज्या आणि रोटी खातो. मी माझ्या कुटुंबास कधीही जुन्या परिस्थितीत पाहू इच्छित नाही.’
(Comedian Bharti Singh tears down while sharing her bad experience in life)