मुंबई : ‘गुत्थी’ आणि ‘डॉ. ‘मशहूर गुलाटी’ची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणारा प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन ‘सुनील ग्रोव्हर‘च्या (Sunil Grover) प्रकृतीबाबत (Sunil Grover Health Update) मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये (Asian Heart Institute) सुनीलवर हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. रिपोर्टनुसार सुनील ग्रोवरच्या हृदयात ब्लॉकेज होते आणि त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आता त्याची प्रकृती स्थिर आहे. शूटिंगमुळे शस्त्रक्रिया लांबणीवर पडली होती. सुनील ग्रोव्हर आज रुग्णालयातून घरी जाऊ शकणार आहे. सुनील ग्रोव्हर सध्या मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये आहे. ANI ने केलेल्या ट्विटमध्ये म्हटल आहे. ‘आताच सुनील ग्रोव्हरच्या हृदयावर शस्त्रक्रिया झाली आहे. यानंतर आता त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला जाईल.
Actor-Comedian Sunil Grover, who underwent heart surgery recently, will be discharged from Mumbai’s Asian Heart Institute today: Hospital authorities
(Photo: Grover’s Twitter account) pic.twitter.com/GrSKCwELMf
— ANI (@ANI) February 3, 2022
छातीत दुखायला लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केलं
सुनील ग्रोवरच्या छातीत दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या अनेक तपासण्या केल्या. त्यानंतर त्याच्या हृदयात ब्लॉकेज असल्याचं समोर आल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सुनील ग्रोवरच्या हृदय शस्त्रक्रियेची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांना ही बातमी ऐकून धक्का बसला. त्यात कालच अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन झाल्याने चित्रपटसृष्टीत सन्नाटा पसरला आहे.
चाहत्यांची सुनीलसाठी प्रार्थना
सुनील लवकर बरा व्हावा अशी चाहत्यांची इच्छा आहे. सुनीलच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना चाहते सोशल मीडियावर करत आहेत. सुनीलच्या एका खास मित्राने सांगितले की, जेव्हा त्यांना सुनीलच्या हार्ट शस्त्रक्रियेची बातमी मिळाली, तेव्हा त्यांच्यासाठीही तो मोठा धक्का होता. सुनील ग्रोव्हरलाही हार्ट सर्जरीची माहिती नव्हती.
स्टार कॉमेडियन आणि बॉलीवूड अभिनेता सुनील ग्रोव्हर हे आज एक प्रसिद्ध नाव आहे. त्याला कोणत्याही परिचयाची गरज नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी सुनीलने खूप मेहनत घेतली आहे. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुनीलने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने त्याच्या स्ट्रगल जर्नीबद्दल सांगितलं होतं.
कोण आहे सुनील ग्रोव्हर?
“मी सुरुवातीपासूनच मिमिक्री करण्यात चांगला होता. मला अभिनयाची आवड होती. लोकांना हसवायला मला सुरुवातीपासूनच आवडत असे. मला आठवतं, मी बारावीत होतो, तेव्हा मी नाटक स्पर्धेत भाग घेतला होता. प्रमुख पाहुण्यांनी मला सांगितले की मी त्यात भाग घेऊ नये, कारण बाकीच्यांवर अन्याय होईल. मी थिएटरमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले, अभिनयासाठी मुंबईला शिफ्ट झालो. त्यानंतर खूप मेहनत घेतली. अखेर कष्टाचं फळ मला मिळालं”, असं सुनील म्हणाला होता.
संबंधित बातम्या