मुंबई : वैशाली ठक्करच्या (Vaishali Takkar) आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. वैशालीने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. यामध्ये तिने अनेक मोठे खुलासे केले आहेत, इतकेच नाही तर तिने त्यामध्ये तिच्या आत्महत्येला (Suicide) कारणीभूत असलेल्या लोकांची नावे टाकून त्यांना शिक्षा देण्याचीही मागणी केलीये. वैशालीने तिच्या सुसाईड नोटमध्ये तिच्या शेजारी असलेल्या राहुल नवलानीचे (Rahul Navalani) नाव घेऊन त्याला शिक्षा द्यावी, ही विनंती देखील केलीये. मात्र, वैशालीने सुसाईड केल्यापासून राहुल हा फरार होता.
वैशाली ठक्करने राहुल नवलानीवरती अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राहुलला गेल्या काही दिवसांपासून पोलिस शोधत होते. पोलिसांनी राहुलला अटक करून न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने राहुलला आता रिमांडवर पाठवले आहे. वैशाली आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल नवलानीला इंदूर पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले.
वैशाली ठक्कर आत्महत्येप्रकरणात पोलिसांनी आपला तपास सुरू केलाय. पोलिसांना राहुलची रिमांड 10 दिवस हवी होती. मात्र, कोर्टाने राहुलला चार दिवसांसाठी रिमांडवर पाठवले आहे. 15 ऑक्टोबर रोजी अभिनेत्री वैशाली ठक्करने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैशालीच्या आत्महत्येनंतर मनोरंजन जगताला मोठा धक्का बसला. वैशालीची आई आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते आहे.