Anup Soni | ‘क्राईम पेट्रोल’ फेम अनुप सोनी आता खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलिसांची मदत करणार

| Updated on: Jul 20, 2021 | 3:09 PM

आंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञानाच्या शिक्षण विभागातून अनुप सोनीने क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. इन्स्टाग्रामवर त्याने आपल्या पदवीचा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे

Anup Soni | क्राईम पेट्रोल फेम अनुप सोनी आता खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलिसांची मदत करणार
Anup Soni
Follow us on

मुंबई : क्राईम पेट्रोल या गुन्हेविषयक मालिकेच्या सूत्रसंचलनामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता अनुप सोनी (Anup Soni) प्रत्यक्ष आयुष्यातही पोलिसांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. गुन्हा घडलेल्या घटनास्थळाची तपासणी करण्यासंदर्भात क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन (Crime Scene Investigation) हा अभ्यासक्रम अनुपने पूर्ण केला आहे.

आंतरराष्ट्रीय फॉरेन्सिक विज्ञान (International Forensic Sciences) शिक्षण विभागातून अनुप सोनीने हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. इन्स्टाग्रामवर त्याने आपल्या पदवीचा फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. क्राईम सीन इन्व्हेस्टिगेटर प्रत्यक्ष घटनास्थळावरुन तपशीलांची नोंद करतात आणि पुरावे गोळा करतात. साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारे ते घटनास्थळाची तपासणी करतात.

काय आहेत अनुपच्या भावना?

‘क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन’मधील सर्टिफिकेट कोर्स. नुकत्याच झालेल्या लॉकडाऊनच्या काळात मी माझा वेळ आणि शक्ती अधिक रचनात्मक पद्धतीत गुंतवण्याचा निर्णय घेतला. होय, हे अत्यंत आव्हानात्मक होते, परत ‘एखाद्या प्रकारचा अभ्यास’ करणं कठीण होतं. पण मला नक्कीच मी ज्याची निवड केली, त्याचा मला अभिमान आहे, असं अनुपने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

कोण आहे अनुप सोनी ?

अनुप सोनी हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा पासआऊट आहे. त्याने शांती, सी हॉक्स, साया यासारख्या मालिकांमधून अभिनयाला सुरुवात केली. मात्र क्राईम पेट्रोल या गुन्हेविषयक सिरीअलच्या सूत्रसंचालनासाठी तो नावाजला गेला. जवळपास आठ वर्ष त्याने या शोचं अँकरिंग केलं. त्याच्याशिवाय या कार्यक्रमाची कल्पनाही चाहत्यांना करवत नाही. अनुप सोनी पर एपिसोड नाही, तर पर किलोमीटरनुसार मानधन घेतो, असे विनोदही अनुपच्या ‘वॉकिंग स्टाईल अँकरिंग’मुळे केले गेले.

मालिका-सिनेमात भूमिका गाजल्या

बालिका वधू मालिकेत त्याने जग्याच्या वडिलांची केलेली भूमिकाही गाजली. तर सीआयडी – स्पेशल ब्यूरोमध्ये एसीपी अजातशत्रूची व्यक्तिरेखा त्याने साकारली. याशिवाय गॉडमदर, फिजा, राज, गंगाजल, अपहरण यासारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. नुकताच तो सैफ अली खानसोबत तांडव या वेब सीरीजमध्ये दिसला.

राज बब्बर यांचा जावई

अनुप सोनी हा दिग्गज अभिनेते राज बब्बर यांचा जावई आहे. 14 मार्च 2011 रोजी अभिनेत्री जुही बब्बर आणि अनुपचा विवाह झाला. 2012 मध्ये त्यांचा मुलगा इमानचा जन्म झाला.

संबंधित बातम्या :

Prateik Babbar | आईला दिली हृदयात जागा! प्रतीक बब्बरने छातीवर कोरला स्मिता पाटीलच्या नावाचा टॅटू

स्मिता पाटील यांचे अनुप सोनीशी कौटुंबिक कनेक्शन माहित आहे का?

(Crime Patrol Host Anup Soni Is Now A Certified Crime Scene Investigator)