Love Story | साधी पण रोमँटिक, दिशा परमार-राहुल वैद्यची प्रेमकथा, जाणून घ्या कशी जमली दोघांची जोडी

| Updated on: Jul 18, 2021 | 10:00 AM

आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने लाखो मुलींची मने जिंकणाऱ्या राहुल वैद्यच्या (Rahul Vaidya) हृदयात मात्र एकच मुलगी होती, ती म्हणजे दिशा परमार (Disha Parmar). राहुल आणि दिशा बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

Love Story | साधी पण रोमँटिक, दिशा परमार-राहुल वैद्यची प्रेमकथा, जाणून घ्या कशी जमली दोघांची जोडी
दिशा-राहुल
Follow us on

मुंबई : आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने लाखो मुलींची मने जिंकणाऱ्या राहुल वैद्यच्या (Rahul Vaidya) हृदयात मात्र एकच मुलगी होती, ती म्हणजे दिशा परमार (Disha Parmar). राहुल आणि दिशा बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. तथापि, दोघांचे कुटुंब आणि जवळचे मित्र सोडले, तर लोकांना याबद्दल माहिती नव्हते. बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर आता राहुल आणि दिशा आयुष्यभराचे जोडीदार बनले आहेत.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांना एकमेकांच्या जवळ आणण्यात त्यांच्या कॉमन मित्रांचा मोठा वाटा आहे. तथापि, सोशल मीडियानेही या दोघांच्या नात्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

दोघांमधील संभाषण कसे सुरू झाले?

राहुल आणि दिशा दोघांची भेट कॉमन मित्रांद्वारे झाली. या दोघांच्या नात्यात सोशल मीडियाचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. दिशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला त्याचे एक गाणे आवडले आणि मी त्याच्या पोस्ट लव्हची प्रतिक्रिया दिली ‘ त्याचवेळी राहुल म्हणाला होता की, ‘मला वाटलं की, ती इतकी सुंदर मुलगी आही, तर मी संधी कशी सोडू. मी दिशाला मेसेज केला आणि त्यानंतर आमचे संभाषण सुरू झाले आणि आम्ही फोन नंबरची देवाणघेवाण केली. मी ‘याद तेरी’ गाण्याचे शूटिंग दिल्लीत करत असताना आमची पहिली भेट झाली.

सुरुवातीला राहुल आणि दिशा चांगले मित्र होते, पण नंतर हळू हळू दोघे एकमेकांच्या जवळ आले. दोघेही एकत्र डेटवर जायचे, खूप फिरायचे. दोघांनीही आपले नाते प्रसिद्धी माध्यमांपासून दूर ठेवले होते. त्यावेळी दोघेही एकमेकांबद्दल पोस्ट करत नव्हते, म्हणून त्यांच्या नात्याबद्दल कोणालाही माहिती नव्हते.

‘सिंगल’ बोलत बिग बॉसमध्ये आला!

राहुल वैद्य जेव्हा बिग बॉसच्या घरात आला तेव्हा त्याने आपले रिलेशनशिप स्टेटस सिंगल असल्याचे सांगितले. त्याने त्यावेळी दिशाबद्दल किंवा तिच्याशी असलेल्या नात्याबद्दल काहीही वक्तव्य केले नाही.

नॅशनल टीव्हीवर केला प्रपोज

जेव्हा दिशा परमारच्या वाढदिवशी नॅशनल टीव्हीवर अभिनेत्रीला लग्नासाठी प्रपोज करत राहुलने सर्वांना चकित केले तेव्हा हे नाते जगासमोर आले. राहुलने आपल्या टीशर्टवर लिहिले ‘दिशा परमार तू माझ्याशी लग्न करशील का?’ यानंतर व्हॅलेंटाईन डेनिमित्त दिशा बिग बॉसच्या घरात आली आणि तिने राहुलच्या प्रस्तावाला सर्वांसमोर उत्तर दिले. दिशा म्हणाली होती, ‘मला खूप धमाकेदार लग्न सोहळा आयोजित करायचाय…’

यानंतर या दोघांनीही सोशल मीडियावर आपले रिलेशनशिप अधिकृत केले. त्यानंतर दोघांनीही उघडपणे एकमेकांबद्दलच्या सोशल मीडिया पोस्ट करायला सुरुवात केली आणि एकमेकांवरचे प्रेम शेअर केले.

लग्नाची घोषणा

यानंतर राहुल आणि दिशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाची घोषणा केली. राहुल आणि दिशा बर्‍याच दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होते आणि अखेर 16 जुलै रोजी दोघेही कायमचे एकमेकांशी जोडले गेले.

(Cute and sweet love story of Disha Parmar And Rahul Vaidya)

हेही वाचा :

Rahul Disha Reception Party Photos : राहुल वैद्य आणि दिशा परमारची ग्रॅन्ड पार्टी, अनुष्का सेनपासून ते अलीपर्यंत ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी

Rahul Disha Wedding : विवाह बंधनात अडकले दिशा परमार-राहुल वैद्य, पाहा लग्नसोहळ्याचे काही खास क्षण…