मुंबई : उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. उर्फीचे हटके आणि बोल्ड फोटो दररोजच सोशल मीडियावर व्हायरल होतात. विशेष म्हणजे उर्फीच्या या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक देखील केले जाते. हटके कपड्यांमुळे का होईना परंतू अत्यंत कमी वेळामध्ये उर्फीने नक्कीच एक वेगळी ओळख तयार केलीये. आज उर्फी जावेद हिला फाॅलो करणाऱ्यांची संख्या देखील जात आहे. उर्फीने ओटीटी बिग बाॅसमधून ओळख मिळवली होती.
उर्फी जावेद हिने काही वेळापूर्वीच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीये. यामुळे ती चर्चेत आहे. उर्फी कायमच तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत असते.
उर्फीने इंस्टाच्या स्टोरीवर चॅटचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. यामध्ये चक्क उर्फीला जीवे मारण्याची आणि रेपची धमकी देण्यात आलीये. याचेच तिने स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.
इतकेच नाहीतर या व्यक्तीविरोधात लगेचच तक्रार देखील केली असती परंतू मी भारतामध्ये नाहीये. असेही उर्फी हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता उर्फीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उर्फी हिने लिहिले की, ज्या व्यक्तीची ही चॅट आहे ही व्यक्ती तीन वर्षांपूर्वी माझा ब्रोकर होता. त्याने आता मला अचानकपणेच मेसेज करण्यास सुरूवात केली. इतकेच नाहीतर त्याने मला फोन करत थेट मर्डर आणि रेप करण्याची धमकी देखील दिलीये.
या व्यक्तीला मी ओळखते. हिंदुस्तानी भाऊ यांच्यासारख्या लोकांची हिच समस्या आहे की, त्यांनी धमकी दिली की आता कोणीही धमकी देऊ शकते. यांना माझी एकच समस्या आहे की, मी हटके कपडे घालते.
उर्फी जावेद हिने थेट ज्या व्यक्तीने तिला धमकी दिली आहे. त्या व्यक्तीचा फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता उर्फी जावेद हिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.