सीतेची व्यक्तिरेखा साकारून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिना बनर्जीने तिच्या व्यक्तिगत दु:खांबाबतचा मोठा खुलासा केला आहे. देबिनाने तिला एंडोमेट्रियोसिस हा आजार झाल्याचं सांगितलंय. या आजारामुळे प्रचंड वेदना होत आहेत. या वेदनांमुळे माझं जगणं मुश्किल झालंय, असं देबिनाने म्हटलंय. देबिनाला दोन मुली आहेत. तिने ब्लॉगवर तिने या वेदनेला वाट मोकळी करून दिली आहे. लियानाच्या जन्मापूर्वीच या आजाराची कशी माहिती मिळाली आणि आता हा आजार पुन्हा कसा बळावला याची माहिती तिने पोस्ट शेअर करून दिली आहे.
देबिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर फॅन्सशी बोलताना ही माहिती दिली आहे. मला काहीच करायची इच्छा होत नाहीये. मला बरं वाटत नाहीये. मी अस्वस्थ आहे. एंडोमेट्रियोसिस हा असा आजार आहे की जो कधीच तुमचा पिच्छा सोडत नाही. एक छोटसं ऑपरेशन आहे. ते करावं लागणार आहे. त्या ऑपरेशननंतर काही काळासाठी बरं वाटेल. पण हा आजार त्यानंतरही परत येतो. मी सध्या कोणतंच औषध घेत नाहीये. मी कधीच कोणीही वेदना दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी औषधे घेत नाही, असं देबिनाने म्हटलंय.
पीरियड्सच्या काळात वेदना होणं नॉर्मल आहे. मला हे माहीत नव्हतं. कारण युवा अवस्थेत मला पीरियड्सच्या काळात कधीच वेदना झाल्या नव्हत्या. जेव्हा मी इतरांकडून ऐकायचे तेव्हा वाटायचं बरं झालं मला काही वेदना होत नाहीत. लियानाच्या जन्माच्या काही वर्ष आधी मला पीरियड्सच्या काळा वेदना होऊ लागल्या. त्यावेळी मला एंडोमेट्रियोसिस आणि एडेनोमायोसिस आजार असल्याचं समजलं. हे आजार गर्भाशयात होतात, असंही तिने सांगितलं.
डॉक्टरांनी मला ग्रेड 4 एंडोमेट्रियोसिस आणि एडेनोमायोसिस असल्याचं सांगितलं. त्या वेदना परत होत आहेत. मी गेल्या दोन तीन महिन्यापासून या वेदना सहन करत आहे. प्रचंड वेदना होत आहेत. हे खूप भयानक आहे. मी घरात राहूनही आराम करू शकत नाही. कारण मला सतत त्या वेदनांची जाणीव होतेय, असं ती म्हणते.
2009मध्ये देबिना आणि गुरमीत यांनी एका मंदिरात लग्न केलं होतं. या दोघांनीही लग्नाची माहिती कुटुंबापासून दोन वर्ष लपवून ठेवली होती. 2011मध्ये दोघांनीही आपआपल्या कुटुंबाशी या विषयावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी धुमधडाक्यात पुन्हा एकदा लग्न केलं होतं.