मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांना जिममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 41 दिवस राजू यांनी मृत्यूशी झुंज दिली. मात्र, अखेर आज त्यांनी प्राणज्योत मावळलीये. राजू यांना रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आल्यापासून त्यांच्या तब्येतीविषयी वेगवेगळे अपडेट मिळत होते. राजू यांना शेवटपर्यंत शुद्ध आली नाही. राजू यांचा ताप कमी होत नसल्याचे डाॅक्टरांनी यापूर्वी सांगितले होते. चाहते आणि कुटुंबीय राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी (Health) सतत प्रार्थना करत होते. वयाच्या 58 व्या वर्षी राजू यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजू श्रीवास्तव यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्हात एका सर्वसामान्य कुटुंबात 15 डिसेंबर 1963 ला झाला होता. रमेश चंद्र श्रीवास्तव असे राजू यांच्या वडिलांचे नाव असून ते एक कवी होते. राजू यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा संघर्ष केलांय. राजू यांच्या अशाप्रकारे अचानक जाण्याने सर्वांचाच मनाला चटका लागलाय. राजू यांचा स्वभाव मुळातच खूप विनोदी होता. त्यांना इतरांना हसवण्यामध्ये एक वेगळाच आनंद मिळायचा. राजू यांनी स्वत: च्या मनगटाच्या बळावर इंडस्ट्री एक वेगळी ओळख निर्माण केली.
राजू यांनी फक्त कॉमेडी शोच केले नसून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. उत्तर प्रदेशातील राजकारणात देखील राजू यांनी आपले नशीब आजमावले होते. 17 मे 1993 रोजी राजू श्रीवास्तव यांचे लग्न शिखा श्रीवास्तवसोबत झाले, विशेष म्हणजे पहिल्याच भेटीमध्ये राजू हे शिखा यांच्या प्रेमात पडले होते. राजू हे फक्त कॉमेडियन नसून त्यांनी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. ‘तेजाब’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले.
राजू श्रीवास्तव यांनी 2005 मध्ये द ग्रेट इंडिया लाफ्टर चॅलेंजमध्ये भाग घेतला आणि तेथूनच त्यांना खरी ओळख मिळाली. इतकेच नाहीतर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतही राजू हे दिसले. सलमान खानचा शो बिग बाॅसमध्येही राजू यांची झलक चाहत्यांना बघायला मिळाली. राजू सोनी टीव्हीवर आणि द कपिल शर्मा शो आणि कॉमेडी नाइट्स विथ कपिलमध्ये अनेकदा राजू हे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. राजू यांना एक मुलगा आयुषमान श्रीवास्तव आणि मुलगी अंतरा असे दोन मुले आहेत.