Devmanus | ‘देवमाणूस’ मालिकेतून ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीची एक्झिट, जाणून घ्या मालिकेत पुढे काय होणार?

| Updated on: Jul 30, 2021 | 2:11 PM

मालिकेत आता ‘चंदा’ या पात्राची एंट्री झाली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री माधुरी पवार ही भूमिका सकारात आहे. मात्र, चंदाचा एंट्रीबरोबरच या मालिकेत एका लोकप्रिय पात्राची मालिकेतून एक्झिट झाली आहे.

Devmanus | ‘देवमाणूस’ मालिकेतून ‘या’ महत्त्वाच्या व्यक्तीची एक्झिट, जाणून घ्या मालिकेत पुढे काय होणार?
देवमाणूस
Follow us on

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. इतक्या कारनाम्यानंतरही डॉ.अजित कुमार देव उर्फ देवी सिंग याला कोर्टाने कोणतेच पुरावे न सापडल्याने निर्दोष मुक्त केलं आहे. पोलिसांच्या तावडीतून सुटल्यानंतर आता डिंपल आणि अजितच्या लग्नाची तयारी सुरु होणार इतक्यात एका नव्या पात्राची एंट्री झाली.

मालिकेत आता ‘चंदा’ या पात्राची एंट्री झाली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्री माधुरी पवार ही भूमिका सकारात आहे. मात्र, चंदाचा एंट्रीबरोबरच या मालिकेत एका लोकप्रिय पात्राची मालिकेतून एक्झिट झाली आहे.

‘आर्या’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप

देवीसिंगचे काळे कारनामे जगाच्या समोर आणण्यासाठी एसीपी दिव्या सिंगला एका नव्या मैत्रिणीची साथ मिळाली होती. ही मैत्रीण होती तिची केस लढणारी वकील आर्या देशमुख. मालिकेत देवीसिंगला तुरुगांत धाडण्यासाठी सरकारी वकिल म्हणून आर्या देशमुख हिची मालिकेत एंट्री झाली होती. ‘वैजू नं 1’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली पाटील हिने ‘देवमाणूस’ या मालिकेत आर्याची भूमिका साकारली होती.

मात्र, आता देवीसिंग ऊर्फ डॉ.अजित कुमार देव हा निर्दोष सिद्ध होऊन मुक्त झाल्याने आर्याची यातील भूमिका तूर्तास तरी संपली आहे. यामुळे मालिकेत ‘आर्या’ या पात्राने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र,काहीच भागांसाठी आलेली ‘आर्या’ प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण करून गेली. त्यामुळे आता प्रेक्षक देखील या पात्राला खूप मिस करत आहेत. याचा बरोबर हे पात्र साकारणाऱ्या सोनालीला देखील चाहते मिस करत आहेत.

चंदाच्या तालावर नाचणार देवीसिंग!

भल्याभल्यांना मृत्युच्या दारात ढकलणारा देवीसिंग ऊर्फ दो. अजित कुमार देव आता चांगलाच अडकणार आहे. चंदाला लग्नाचं आमिष दाखवून, तिच्याकडून पैसे घेऊन फरार झालेला देवीसिंग अखेर आता चंदाच्या हाती लागला आहे. देवीसिंगने फसवल्यामुळे नको असूनही दारूच्या धंद्यात फसलेली चंदा आता देवीसिंगचा बदला घेणार आहे. डॉ. अजित कुमार देवच देवीसिंग असल्याचा पुरावा चंदाकडे असल्याने, एरव्ही इतरांवर हुकुम गाजवणारा देवीसिंग आता चक्क चंदाच्या तालावर नाचणार आहे.

(Devmanus zee Marathi serial update this popular character said goodbye to serial)

हेही वाचा :

 अमृता खानविलकरच्या नव्या फोटोशूटनं केला कहर, निळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसला कातिलाना अंदाज

Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल 12’ स्क्रिप्टेड म्हणणाऱ्यांना आदित्य नारायणनं फटकारलं, म्हणाला…