मुंबई : कॉमेडियन-अभिनेता कृष्णा अभिषेकची (Krushna Abhishek) पत्नी कश्मीरा शाह (Kashmera Shah) आता क्वचितच रुपेरी पडद्यावर दिसते. परंतु, तिच्या हॉटनेसने सोशल मीडियावर चर्चा निर्माण करण्यात कधीही अपयशी ठरत नाही. कश्मीरा शाहने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामुळे इंटरनेटवर चांगलीच खळबळ उडाली आहे. व्हिडीओत कश्मीरा शाहचे सौंदर्य पाहून चाहत्यांचे देखील होश उडाले आहेत.
या व्हिडीओमध्ये कश्मीरा शाहने स्पोर्ट्स ब्रा परिधान केली आहे आणि ती पूलच्या बाजूला बसलेली दिसत आहे. व्हिडीओमध्ये ती सुरुवातीला थोडी उदास दिसत होती, पण नंतर ती कॅमेराकडे पाहून हसायला लागते. यात ती वेगवेगळ्या पोजमध्ये क्लिक केलेले फोटो बघत असल्याचे दिसत आहे. तर व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये ‘चका चक’ हे गाणे ऐकायला मिळत आहे. कश्मीरा शाहचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची मनं घायाळ झाली आहेत. यूजर्स कमेंट करून कश्मीराच्या फिटनेसचे कौतुक करत आहेत.
कश्मीरा शाहच्या या व्हिडीओवर चाहते भरभरून कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिलं की, ‘ये कितनी ओसम है यार.’ दुसर्याने कमेंट केली, ‘तू खूप सुंदर आहेस’ आणखी कोणीतरी लिहिले, ‘या वयातही तू एकदम फिट दिसत आहेस.’ अशाप्रकारे चाहते कश्मीराचे कौतुक करताना थकत नाहीयत. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
कश्मीरा शाह आणि कृष्णा अभिषेकची प्रेमकहाणी चित्रपटापेक्षा कमी नाही. कश्मीराचे लग्न त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेता कृष्णा अभिषेकशी (Krushna Abhishek) झाले. 2005 मध्ये या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. ‘और पप्पू पास हो गया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जयपूरमध्ये हे दोन्ही स्टार्स पहिल्यांदा भेटले होते. कश्मीरा तेव्हा निर्माता ब्रॅड लिस्टरमनची पत्नी होती. यानंतर कश्मिराने आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि 2013 मध्ये कृष्णाशी लग्न केले. कृष्णा आणि कश्मीरा मे 2017 मध्ये जुळ्या मुलांचे पालक झाले. सरोगसीद्वारे त्यांच्या जुळ्या मुलांचा जन्म झाला.
Janhvi Kapoor | परी म्हणू की सुंदरा… जान्हवी कपूरच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही घायाळ!