मुंबई : बिग बाॅस १५ विजेती तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) कायमच चर्चेत असते. बिग बाॅसची विजेती झाल्यानंतर तेजस्वी प्रकाश हिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झालीये. तेजस्वी सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असते. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) यांची जोडी चाहत्यांना देखील आवडते. बिग बाॅसच्या घरात तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची लव्ह स्टोरी सुरू झाली होती. यादरम्यान बिग बाॅसच्या घरात असताना अनेकदा यांच्यामध्ये खटके उडायचे. इतकेच नाहीतर घरातील काही सदस्यांनी यांचे भांडणे लावण्याचा देखील प्रयत्न केला होता. मात्र, आता बिग बाॅसच्या घराबाहेर येऊन जवळपास एक वर्ष झाले असून करण कुंद्रा आणि तेजस्वी यांच्यातील प्रेम वाढताना दिसत आहे. बऱ्याच वेळा करण कुंद्रा हा तेजस्वी प्रकाश हिला घेण्यासाठी नागिन ६ च्या सेटवर देखील जायचा. तेजस्वी प्रकाश हिच्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन करण आणि तेजस्वी यांनी गोव्यात केले होते.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची जोडी चाहत्यांना अगोदरपासूनच आवडत आहे. अनेकदा करण कुंद्रा याचे फोटो तेजस्वी शेअर करते आणि तेजस्वीचे फोटो करण कुंद्रा हा सोशल मीडियावर शेअर करतो.
गेल्या काही दिवसांपासून चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. अनेकदा करण आणि तेजस्वी हे पार्टीमध्येही सोबतच हजेरी लावतात. करण आणि तेजस्वीचा काही दिवसांपूर्वीच पार्टीमध्ये डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
एकता कपूर हिच्या नागिन ६ या मालिकेमध्ये तेजस्वी प्रकाश ही मुख्य भूमिकेत होती. आता ही मालिका बंद होणार आहे तर करण कुंद्रा हा आगामी इश्क में घायल या मालिकेत दिसणार आहे.
नुकताच सोशल मीडियावर करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांचा पार्टीमधील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. या व्हिडीओमध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यासोबत अर्जुन बिजलानी देखील दिसत आहे.
पार्टीमध्ये करण कुंद्रा हा सर्वांसमोरच तेजस्वी प्रकाश हिची किस घेताना दिसत आहे. करण आणि तेजस्वीला किस घेताना बघितल्यावर अर्जुन बिजलानी याने व्हिडीओ सुरू असल्याचे करणच्या लक्षात आणून दिले.
आता हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी करण आणि तेजस्वी यांना चांगलेच खडेबोल सुनावल्याचे दिसत आहेत.
एका युजर्सने कमेंट करत लिहिले की, माहिती नाही पण हे दोघेही मला खूपच जास्त फेक दिसतात. दुसऱ्याने लिहिले की, हा करण कुंद्रा खूपच जास्त थर्ड क्लास आहे यार…तिसऱ्याने लिहिले की, पागल आहे हे जेंव्हा बघावे तेंव्हा किसच करताना दिसतात.