मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सध्या रिमेकचे युग सुरू आहे. अनेक हिंदी चित्रपटांच्या कथा या दाक्षिणात्य चित्रपट किंवा हॉलिवूडमधून घेतली गेली आहे. इतकेच नाही तर, असेही अनेक चित्रपट आहेत ज्यांचा आशय जुन्या हिंदी चित्रपटांमधून कॉपी करून नवीन तडका देऊन प्रेक्षकांसमोर आणला आहे. अनेकवेळा निर्मात्यांची ही मेहनत प्रेक्षकांना आवडते, तर काही वेळा लोक जोरदार टीकाही करतात. त्याचबरोबर आता टीव्ही इंडस्ट्रीतही रिमेकचे युग पाहायला मिळत आहे.
टीव्ही जगतातही अशा अनेक मालिका आहेत, ज्यांचा आशय आणि कथा कुठूनतरी उचलली गेली आहे. अशा अनेक मालिका आहेत, ज्यांची संकल्पना बॉलिवूड चित्रपटांमधून घेण्यात आली आहे. यातील काही मालिका हिट तर काही फ्लॉप ठरल्या. आज आपण अशाच काही मालिकांबद्दल जाणून घेणार आहोत…
झी टीव्हीवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेत शालीन भानोत आणि शुभांगी अत्रे ही जोडी एकत्र दिसली होती. ही मालिका शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटावर आधारित होती, ज्यामध्ये शालीन भानोतने शाहरुख खानसारखी भूमिका साकारली होती. या मालिकेला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला.
पवित्रा पुनिया आणि सिद्धार्थ शुक्ला स्टारर सीरियल ‘लव्ह यू जिंदगी’ ही ‘जब वी मेट’ या चित्रपटावर आधारित होती. या मालिकेत पवित्रा पुनियाने ‘गीत’ची भूमिका साकारली होती, जी चित्रपटात करीना कपूरने साकारली होती. करीना कपूरचा हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला. मात्र, ही मालिका प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करू शकली नाही.
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, रश्मी देसाई आणि जास्मिन भसीन स्टारर ‘दिल से दिल तक’ ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. ही मालिका ‘चोरी चोरी चुपके चुपके’ या चित्रपटावर आधारित होती, ज्यामध्ये सरोगसीची कथा दाखवण्यात आली होती.
दृष्टी धामी आणि अर्जुन बिजलानी यांची मालिका ‘परदेस में है मेरा दिल’ ही ‘परदेस’ या चित्रपटावर आधारित होती. या मालिकेचे शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते. मात्र, खूप मेहनत करूनही या मालिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले नाही.
टीव्ही मालिका ‘नामकरण’ ही ‘जख्म’ चित्रपटाची कॉपी मानली जाते. दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांच्या चित्रपटावर आधारित ही मालिका बनवल्याचा दावा केला जात आहे. या मालिकेत बरखा सेनगुप्ता, रीमा लागू आणि झैन इमाम दिसले होते. या मालिकेच्या कथेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
या मालिकांच्या यादीत रजत टोकस आणि परिधी शर्मा यांची मालिका ‘जोधा अकबर’ हिच्या नावाचाही समावेश आहे. ही मालिका ‘जोधा अकबर’ या हिट चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर ही मालिका प्रेक्षकांसमोर आली होती. चित्रपटापेक्षा मालिकेला अधिक पसंती मिळाली होती.
Sharad Ponkshe Post | आधी आरोपांच्या फैरी झाडल्या, आता शरद पोंक्षेंची पोस्ट डिलीट, नेमकं प्रकरण काय?