मुंबई : टीव्ही अभिनेत्री आणि बिग बाॅस १४ (Bigg Boss 16) ची विजेती रुबीना दिलैक कायमच चर्चेत असते. रुबीना दिलैक ही तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. बिग बाॅसच्या घरात असताना अनेकदा सलमान खान याच्यासोबत तिचे खटके उडाले होते. काहीही झाले तरीही रुबीना ही आपले म्हणणे कायम मांडते. रुबीना दिलैक हिचे हिंदी भाषेवर मोठे प्रभुत्व आहे. बिग बाॅस १४ मध्ये रुबीना दिलैक (Rubina Dilaik) हिच्यासोबत तिचा पती अभिनय शुक्ला देखील सहभागी झाला होता. जबरदस्त खेळ रुबीना दिलैक हिने बिग बाॅसच्या घरात खेळला आणि बिग बाॅस १४ ची विजेती झाली. उद्या बिग बाॅस १६ चा फिनाले (Bigg Boss 16 Finale) असून त्यापूर्वी रुबीना दिलैक ही चर्चेत आलीये. मात्र, यावेळी ती बिग बाॅसमुळे नाही तर तिच्या खराब झालेल्या तब्येतीमुळे चर्चेत आलीये. बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुबीना दिलैक हिने खतरो के खिलाडी आणि झलक दिखला जा या शोमध्ये सहभाग घेतला होता.
नुकताच रुबीना दिलैक हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. रुबीना दिलैक हिचे हे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. फोटो बघितल्यानंतर रुबीना दिलैक हिचे चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसत आहेत.
दुसरीकडे रुबीना दिलैक हिचे हे फोटो पाहून अनेकांनी तिला ट्रोल करण्यासही सुरूवात केलीये. रुबीना दिलैक हिने जे फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये तिचा संपूर्ण चेहरा हा सुजलेला दिसत आहे.
या फोटोमध्ये तिचे डोळे लाल दिसत असून सुजले आहेत. इतकेच नाही तर चेहऱ्यासोबतच रुबीना दिलैक हिचे ओठ देखील खूप जास्त सुजले आहेत. हे फोटो शेअर करताना रुबीना दिलैक हिने काय झाले याची माहितीही शेअर केलीये.
रुबीना दिलैक हिने पोस्टमध्ये म्हटले की, ताप, घसा खराब, संसर्ग आणि सुजलेले ओठ…मी बदकासारखी दिसत आहे…रुबीना दिलैक हिची ही पोस्ट पाहून तिचे चाहते तिला काळजी घेण्याचा सल्ला देत आहेत.
दुसरीकडे काही युजर्स हे रुबीना दिलैक हिला ट्रोल करताना दिसले. एकाने लिहिले की, प्लास्टिक सर्जरी चुकीची झाली का?, दुसऱ्याने लिहिले की, ही काही दाखवण्याची गोष्ट आहे का? फेक लेडीज…, तिसऱ्याने लिहिले की, हे लोक काहीही करू शकतात…